मुंबई, 11 सप्टेंबर : नेहमी आपल्या बोल्डनेससाठी चर्चेत असलेली मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेनं (Poonam Pandey) अखेर लग्न केलं आहे. तिनं गुपचूप आपला विवाह सोहळा आटोपला आहे. बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसह ती लग्नाच्या बेडीत अडकली आहे. तिने आपल्या सोशल मीडियावर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो व्हायरल होत आहेत.
जुलै 2019 मध्येच सॅमने आपल्या सोशल मीडियावर साखरपुड्याची बातमी चाहत्यांना दिली होती. दोघांच्याही हातात रिंग दिसत होती. आता दोघांनीही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये पूनम, सॅम वेडिंग ड्रेसमध्ये दिसत आहेत. पूनमने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, "पुढील सात जन्म मला तुझ्यासह आयुष्य जगायचं आहे". त्यावर "हो नक्कीच मिसेस बॉम्बे", अशी कमेंट सॅमने केली आहे.
View this post on Instagram
सॅमनेदेखील काही फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पूनमच्या मेहंदीचा हा फोटो आहे. मिस्टर आणि मिसेस बॉम्बे असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.
View this post on Instagram
पूनम आणि सॅमचा हा फोटोही अतिशय सुंदर आहे. यामध्ये सॅम पूनमच्या कानात काहीतरी सांगतो आणि पूनम लाजत हसताना दिसते आहे.
View this post on Instagram
पूनम आणि सॅम दोघांच्या नात्याबाबत आधीपासूनच सर्वांना माहिती होती. दोघंही नेहमी एकत्र दिसले आहेत. पूनम सॅमसह आपले फोटो आणि व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत आली आहे. जुलै 2020 साखरपुडा आणि आता सप्टेंबरमध्ये दोघंही एकमेकांसह विवाहबद्ध झाले आहेत. त्यांचे फोटो पाहून चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हे वाचा - बिग बीनंतर सनी लिओनीनं खरेदी केली अलिशान कार, PHOTO पाहून व्हाल थक्क
पूनम पांडेने नशा फिल्ममधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमाची कथा आणि विषय यावरून खूप वादही झाले. पूनम या सिनेमातून पहिल्यांदा सिल्व्हर स्क्रीनवर त्याच बोल्ड अवतारात दिसली मात्र तिचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. 'द जर्नी ऑफ कर्मा'मुळे काही दिवसांपूर्वी पूनम पुन्हा एकदा चर्चेत आली होती. या सिनेमात शक्ति कपूर यांच्यासोबत पूनमनं दिलेले हॉट सीन चर्चेचा विषय बनले. तिचा हा सिनेमाही प्रेक्षकांची पसंती मिळवण्यास अपयशी ठरला.
हे वाचा - OMG! चिरंजीवीचा नवीन लुक पाहिलात का? Bald फोटो पाहून चाहते शॉक
फिल्ममध्ये ती आपली जादू दाखवू शकली नाही. मात्र बोल्डनेसमुळे ती खूप प्रसिद्ध झाली. अभिनय क्षेत्रात येण्याआधी पूनम एक प्रसिद्ध मॉडेल होती. 2011 च्या कॅलेंडर गर्ल्सच्या मॉडेलद्वारे तिला मॉडेलिंग क्षेत्रात नवी ओळख मिळाली. याशिवाय ग्लॅडरेग्स 2010च्या पहिल्या आठ स्पर्धकांमध्ये पूनमचा समावेश होता. पूनम फक्त बोल्डच नाही तर कॉन्ट्रोव्हर्सी क्वीनही आहे. अनेकदा तिनं विवादात्मक विधान करुन बॉलिवूडमध्ये खळबळ माजवली आहे. 2011 साली झालेल्या विश्वचषकाच्या वेळी पूनम वादात सापडली होती. विश्वचषक सुरु झाल्यावर लगेचच पूनमने सोशल मीडियावर सेमी न्यूड फोटो पोस्ट करत या फोटोंद्वारे मी भारतीय संघाला प्रेरित करत आहे असं म्हटलं होतं. तिच्या या पोस्टमुळे बरेच वाद निर्माण झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Poonam pandey