Home /News /entertainment /

नवऱ्याच्या मारहाणीमुळे झालं ब्रेन हॅमरेज; वास घ्यायची क्षमताच नष्ट झाल्याचा मॉडेल पूनम पांडेचा दावा

नवऱ्याच्या मारहाणीमुळे झालं ब्रेन हॅमरेज; वास घ्यायची क्षमताच नष्ट झाल्याचा मॉडेल पूनम पांडेचा दावा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूनम पांडेने एक खुलासा केलाय. कौटुंबिक छळामुळे तिनं तिची एक महत्त्वाची क्षमताचं नष्ट झाल्याचे सांगितलं आहे.

    मुंबई, 7 मे- अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) शो लॉक अप (Lock Upp) आता फिनालेच्या अगदी जवळ येऊन पोहोचला आहे. या शोमध्ये शिवम शर्मा, मुनव्वर इकबाल फारूकी आणि प्रिन्स नरूला हे आतापर्यंत फायनलमध्ये पोहोचले आहेत. दरम्यान, अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey ) ही ‘लॉक अप’ या शोमधील सर्वात स्ट्राँग स्पर्धकांपैकी एक होती. परंतु, ग्रँड फिनालेच्या काही दिवसांपूर्वी ती शोमधून आऊट झाली. गेले अनेक महिने पूनम कंगनाच्या या अत्याचारी तुरुंगात टिकून होती. या शोमध्ये पूनम पांडेने आयुष्यातील बऱ्याच घटनांविषयी सांगितलं. तिचं मोडलेलं लग्न, कौटुंबिक अत्याचार, आत्महत्येची झालेली इच्छा ते तिच्या कुटुंबाला कसं बहिष्कृत केलं गेलं, अशा बऱ्याच विषयांवर पूनम लॉक अपमधील इतर स्पर्धकांशी बोलताना दिसली होती. आता, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूनमने एक खुलासा केलाय. कौटुंबिक छळामुळे तिची वास घेण्याची क्षमता कमी झाली आहे, असा खुलासा पूनमने केलाय. वाचा-'..तिथं जीव मारण्याची परवानगी मिळतेच कशी' सयाजी शिंदे यांची संतप्त प्रतिक्रिया ETimes शी बोलताना पूनम पांडेने याबद्दल खुलासा केला. ती म्हणाली, “मला गोष्टींचा वास येत नाही, मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना वासाबद्दल विचारते, आजकाल अशाप्रकारेच मी गोष्टींचा वास घेते. माझ्यासोबत घरगुती हिंसाचार झाल्यानंतर मी वास घेण्याची क्षमता पूर्णपणे गमावली. वास घेण्याची क्षमता गमावणं हे ब्रेन हॅमरेजशी संबंधित आहे. पण प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास मी सध्या मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप मजबूत (Mentally and Physically Stronger) आहे." वाचा-या' अभिनेत्रीसोबतचा फोटो शेअर करत मृण्मयी म्हणाली, 'ती जास्त चांगली दिसते' लॉक अपमध्ये असताना पूनमने तिला ब्रेन हॅमरेज (Brain Haemorrhage) झाल्याची माहिती दिली होती. तिचा आधीचा पती सॅम बॉम्बे तिला पुन्हा-पुन्हा डोक्याला एकाच ठिकाणी मारत असल्याने तिची दुखापत बरी होऊ शकली नाही, असंही पूनमने सांगितलं होतं. “मी ते सर्व लपवण्यासाठी मेकअप, ग्लॉस लावते आणि हसते. मी सगळ्यांसमोर खूप छान वागते,” असंही पूनम म्हणाली.
    दरम्यान, लॉक अपमधील टॉप 8 स्पर्धकांमध्ये पूनमचा समावेश होता. एका मुलाखतीत तिने करण कुंद्राबद्दल (Karan Kundra) खुलासा केला आणि म्हणाली, “करण कुंद्रा हा एक स्वच्छ मनाचा माणूस आणि खूप चांगला जेलर आहे. तो व्यक्ती म्हणूनही खूप चांगला आहे. आपण जितके वाईट खेळू शकतो तितकं वाईट तो खेळायला लावतो. मला आशा आहे की, शो नंतर मी त्याला भेटेन आणि मला त्याच्यासोबत आणखी काही काम करण्याची संधी मिळेल. तसंच लॉक अप हा शो मुनव्वर फारुखीने जिंकावा, असं वाटतं असल्याचे देखील पूनमने सांगितलं
    First published:

    Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Tv shows

    पुढील बातम्या