तुम्ही ढिंच्याक पूजाचं 'हे' नवीन गाणं पाहिलं का?

तुम्ही ढिंच्याक पूजाचं 'हे' नवीन गाणं पाहिलं का?

ढिंच्याक पूजाचं हे गाणं आधीच्या सगळ्याचं गाण्यांपेक्षा चांगलं आणि वेगळं आहे.

  • Share this:

 

22 सप्टेंबर:आपल्या गाण्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या ढिंच्याक पूजाचं नवीन गाणं रिलीज झालंय.ढिंच्याक पूजाचं हे गाणं आधीच्या सगळ्याचं गाण्यांपेक्षा चांगलं आणि वेगळं आहे.

आपल्या गाण्यांमुळे वादग्रस्त ठरलेल्या ढिंच्याक पूजाचं नवीन गाणं रिलीज झालंय. या गाण्याला संगीत मात्र पूजाने नाही तर डीजे सम्राटने दिलं आहे. बाबू दे दे थोडा कॅश नावाच्या गाण्यात पूजा तिच्या श्रीमंत वडिलांना पैसा मागते आहे. इतकंच नाही तर तिला कशासाठी पैसे हवे याची कारणंही ती सांगते आहे. तरूणाईच्या ओठांवर रूळतील असे या गाण्याचे बोल आहे आणि थिरकायला लावेल असं डीजे सम्राटचं संगीत आहे.

पूजाच्या सेल्फी मैंने ले ली आज , स्कुटर, दारू दारू दारू या गाण्यांवर प्रचंड टीका झाली होती. आता तिचं हे नवीन गाणं वादग्रस्त ठरतं की लोकांच्या पसंतीस उतरतं हे लवकरचं कळेल. पण तिचे टीकाकार आणि फॅन्स दोघंही हे गाणं ऐकतील हे निश्चित.

First Published: Sep 22, 2017 08:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading