मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

तुम्ही पाहिलंय का अभिनेत्री पूजा सावंतच्या बहिणीला? दिसतेय तिचीच कार्बन कॉपी

तुम्ही पाहिलंय का अभिनेत्री पूजा सावंतच्या बहिणीला? दिसतेय तिचीच कार्बन कॉपी

अभिनेत्री पूजा सावंतला आज कोण नाही ओळखत. पूजा सावंतने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा कस दाखवला आहे.

अभिनेत्री पूजा सावंतला आज कोण नाही ओळखत. पूजा सावंतने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा कस दाखवला आहे.

अभिनेत्री पूजा सावंतला आज कोण नाही ओळखत. पूजा सावंतने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा कस दाखवला आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 9ऑक्टोबर- चाहत्यांना नेहमीच आपल्या लाडक्या कलाकरांबद्दल जाणून घ्यायला आवडतं. तसेच प्रत्येक चाहता आपल्या आवडत्या कलाकाराच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतो. मग या कलाकारांच बालपण असो मित्र किंवा कुटुंब या सर्वांबद्दल चाहत्यांना फार उत्सुकता असते. आज आपण मराठमोळी(Marathi Actress) अभिनेत्री पूजा सावंतच्या(Pooja Sawant) बहिणीला पाहणार आहोत.
अभिनेत्री पूजा सावंतला आज कोण नाही ओळखत. पूजा सावंतने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा कस दाखवला आहे. पूजा सावंतने आपल्या ११ वर्षांच्या अभिनय प्रवासात विविध धाटणीच्या भूमिका साकारत मनोरंजनसृष्टीत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे पूजा सावंतचा एक खास चाहतावर्ग निर्माण झाला आहे. तिच्या चाहत्यांना नेहमीच तिच्या प्रत्येक गोष्टीची उत्सुकता असते. आज आपण या अभिनेत्रींच्या बहिणीबद्दल जाणून घेणार आहोत. पूजा सावंत आपल्या बहिण-भावाच्या खूपच जवळ आहे. या भावंडांमध्ये फारच खास बॉन्डिंग आहे. पूजा नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या बहीण भावासोबत फोटो शेअर करत असते.
अभिनेत्री असो किंवा सर्वसामान्य मुलगी नेहमीच आपल्या बहिणीच्या अत्यंत जवळ असते. असंच काहीसं आहे अभिनेत्री पूजा सावंतचं. पूजा सावंतच्या लहान बहिणीचं नाव रुचिरा सावंत असं आहे. पूजा आणि रुचिरा या दोघींचं नातं एखाद्या मैत्रिणीसारखं आहे. त्या दोघीही सतत सोबत वेळ घालवताना दिसून येतात. रुचिरासुद्धा बहीण पूजासारखीच स्टायलिश आणि सुंदर आहे. पूजाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेकवेळा बहिणीसोबत तसेच कुटुंबातील इतर व्यक्तीसोबतचे फोटो पाहायाला मिळतात. पूजाला एक बहीण आहे. पूजा ही सर्वत मोठी आहे. पूजाची बहीण रुचिरासुद्धा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती सतत आपले फोटो शेअर करत असते. यामध्ये ती अनेकवेळा सैरसपाटा करतानाही दिसून येते. रुचिराही अनेक चाहत्यांना पूजाची कार्बन कॉपीच असल्याचं वाटतं. त्यामुळे अनेकांना तीसुद्धा बहिणीप्रमाणे अभिनयात पदार्पण करणार का अशी उत्सुकता लागून असते. मात्र सध्या तरी रुचिरा या क्षेत्रापासून दूर आहे. (हे वाचा:महाकाली' रूपात दिसली 'आई कुठे...'फेम रुपाली भोसले! अभिनेत्रीचं होतंय कौतुक) पूजाला आपल्या घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला आहे. पूजाचे वडील विलास सावंत हे एक रंगमंचावरील अभिनेता आहेत. त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे. तसेच पूजाचे आजोबासुद्धा रंगमंच अभिनेता होते. त्यामुळे हे बाळकडू पूजाला तिच्या घरातूनच मिळाले आहे. पूजाने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी 'मटा श्रावण क्वीन २००८' हा सन्मान पटकावला आहे. या स्पर्धेमुळेच तिला अभिनयाची दारे खुली झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या स्पर्धेमध्ये अभिनेता सचित पाटील परीक्षक म्हणून उपस्थित होता. या स्पर्धेमध्ये पूजा सावंतच परफॉर्मन्स पाहून सचितने तिला 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. त्यांनतर पूजाने कधीच मागे वळून पाहिले नाही. पूजाने दगडी चाळ, लपाछपी, झकास, निळकंठ मास्तर, पोस्टर बॉईज अशा चित्रपटांत काम केलं आहे. तर जंगली या बॉलिवूड चित्रपटात तिने अभिनेता विद्युत जामवालसोबत काम केलं आहे.
First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment

पुढील बातम्या