• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Daughter's Dayच्या आधीच पूजा सावंतने शेअर केल्या सुंदर आठवणी; VIDEO पाहून व्हाल भावुक

Daughter's Dayच्या आधीच पूजा सावंतने शेअर केल्या सुंदर आठवणी; VIDEO पाहून व्हाल भावुक

सुंदर व्हिडीओ शेअर करत पूजाने आपण 'डॉटर्स डे'च्या प्रतीक्षेत असल्याचं म्हटलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 सप्टेंबर- याववर्षीचा 'कन्या दिवस'(Daughter's Day) अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वच लेकींना उत्सुकता लागून राहिली आहे. मग सर्वसामान्य मुली असो किंवा अभिनेत्री सर्वांनाच या दिवसाची उत्सुकता असते. दरम्यान अभिनेत्री पूजा सावंतने (Pooja Sawant) काऊंट डाऊन सुरु सुद्धा केलं आहे. पूजाने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर जुन्या आणि नव्या फोटोंचा सुंदर व्हिडीओ (Share Video) बनवून शेअर केला आहे. तसेच आपल्या कन्या दिवसाची अर्थातच 'डॉटर्स डे' ची उत्सुकता जाहीर केली आहे. अभिनेत्री पूजा सावंतचं आपल्या कुटुंबासोबत आई-वडिलांसोबत किती सुंदर नातं आहे, हे सतत सोशल मीडियावर पाहायला मिळत. पूजा अनेकवेळा आपल्या आईवडिलांसोबतचे फोटो शेअर करत असते. आजही पूजाने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. पण हा व्हिडीओ फारच खास आहे. कारण यामध्ये पूजाने आपल्या बालपणापासून ते आत्तापर्यंतच्या आठवणींचा आईवडिलांसोबतच्या कोलाज केला आहे. यामध्ये पूजा आणि तिच्या आईवडिलांचे अनेक सुंदर क्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत. (हे वाचा:गौतमी देशपांडे घेतेय ट्रेकिंगचा आनंद; सुंदर Reel शेअर करत जिंकलं चाहत्यांचं मन) हा सुंदर व्हिडीओ शेअर करत पूजाने आपण 'डॉटर्स डे'च्या प्रतीक्षेत असल्याचं म्हटलं आहे. लेक ही घरची लक्ष्मी मानली जाते. लेकीच्या घरी असण्याने घर अगदी चिमण्यांसारखं चिवचिव करत असत. जुन्या बुरसटलेल्या विचारांना तिलांजली देत अनेक लोकांनी लेकीला आपलं सर्वस्व मानलं आहे. त्यामुळेच आज प्रत्येक लेक आपआपल्या क्षेत्रात आपलं आणि आपल्या आई-वडिलांचं नाव चमकवत आहे. अशीच पूजाही आहे. पूजाने मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाने आपली एक विशिष्ट छाप पाडली आहे. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनासुद्धा तिच्यावर अभिमान आहे. येत्या २६ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जाणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: