आता 'मनाडू' हा ब्लॉकबस्टर तमिळ चित्रपट दिग्दर्शित केलेल्या व्यंकट प्रभू यांच्या आगामी चित्रपटात नागा चैतन्यसोबत पूजा हेगडे अशी जोडी असेल, अशी जोरदार चर्चा आहे. मनाडूचा हा तेलुगू रिमेक असेल. व्यंकट प्रभू यांचा हा पहिला तेलुगू चित्रपट असेल. यात पूजा हेगडेला हिरॉइन म्हणून घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला असून, त्या संदर्भात पूजा हेगडेशी संपर्क साधल्याचं वृत्त आहे. यामुळे पूजा दुसऱ्यांदा नागा चैतन्यसोबत झळकणार आहे. याआधी तिनं ‘ओका लैला कोसम’ या तेलुगू चित्रपटामध्ये नागा चैतन्यसोबत काम केलं होतं. हे वाचा-VIDEO: फरहान अख्तर-शिबानी दांडेकरच्या मेहंदी समारंभात थिरकली रिया चक्रवर्ती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा हेगडेने नागा चैतन्यसोबत नव्या चित्रपटात काम करण्याची तयारी दर्शवली आहे; मात्र अद्याप या चित्रपटाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे चाहत्यांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. सध्या पूजा हेगडे 'आचार्य'मध्ये रामचरण आणि 'बीस्ट' या तमिळ चित्रपटामध्ये विजयसोबत काम करत असून, तिच्या विजयसोबतच्या गाण्याची सध्या चांगलीच चर्चा आहे.View this post on Instagram
पूजा हेगडे आणि थलपथी विजयवर चित्रित करण्यात आलेलं 'हलमिथी हबीबो' हे गाणं चांगलंच गाजत असून, समंथाने नुकतंच एअरपोर्टवर या गाण्यावर काही स्टेप्स करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तिने पूजा हेगडे आणि विजयलाही तिनं टॅग केलं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.