मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /पूजा बेदीला 30 वर्षांनंतर आठवला कंडोमच्या जाहिरातीचा फोटोशूट, केलं स्वत:च कौतुक

पूजा बेदीला 30 वर्षांनंतर आठवला कंडोमच्या जाहिरातीचा फोटोशूट, केलं स्वत:च कौतुक

पूजा बेदीने अलीकडेच इन्स्टाग्रामवर (Instagram) काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंमध्ये पूजासोबत मार्क रॉबिन्सन (Mark Robinson) दिसत आहे.

पूजा बेदीने अलीकडेच इन्स्टाग्रामवर (Instagram) काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंमध्ये पूजासोबत मार्क रॉबिन्सन (Mark Robinson) दिसत आहे.

पूजा बेदीने अलीकडेच इन्स्टाग्रामवर (Instagram) काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंमध्ये पूजासोबत मार्क रॉबिन्सन (Mark Robinson) दिसत आहे.

  मुंबई, 20 मार्च  : बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी (Pooja Bedi) हॉटनेस, बोल्डनेस या कारणांनी अनेकदा चर्चेत असते. टीव्हीवरच्या अनेक जाहिरातींमध्येही ती आतापर्यंत झळकली आहे. त्यातील अनेक जाहिराती अशा होत्या, की त्यांची केवळ चर्चाच झाली नाही, तर त्यावर वादही झाले. अशीच आपली एक वादग्रस्त जाहिरात पूजाला तीस वर्षांनी पुन्हा आठवली आहे. 1991मध्ये पूजा बेदीने कंडोमच्या (Condom Ad) एका जाहिरातीत काम केलं होतं. त्या जाहिरातीवरून बरेच वाद झाले होते. आता तीस वर्षांनी पूजा त्या जाहिरातीच्या स्मरणरंजनात दंग झाली असून, त्या वेळी केलेल्या फोटोसेशनमधले फोटो खूप छान होते, असं सांगत तिने त्या आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

  पूजा बेदीने अलीकडेच इन्स्टाग्रामवर (Instagram) काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंमध्ये पूजासोबत मार्क रॉबिन्सन (Mark Robinson) दिसत आहे. ते फोटो शेअर करून पूजाने लिहिलं आहे - 'भगवान! 1991 साली कामसूत्र कंडोमच्या जाहिरातीसाठी प्रबुद्ध दासगुप्ताद्वारे करण्यात आलेल्या माझ्या शूटवेळी काही उत्तम फोटोग्राफ्स काढले गेले होते.'

  या पोस्टमध्ये पूजाने गौतम सिंघानिया (Gautam Singhania) यांनाही टॅग केलं आहे.

  पूजा आणि मार्क यांनी ही जाहिरात एका कंडोम कंपनीसाठी केली होती. 1991मध्ये ही जाहिरात फारच बोल्ड मानली गेल्याने दूरदर्शनवर तिच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली होती. आता इतक्या वर्षांनी पूजाचे त्या वेळचे हे फोटोज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. काही सोशल मीडिया युझर्स पूजाचं यावरून बरंच कौतुक करत आहेत, तर काही युझर्सना मात्र हे फोटो आवडलेले नाहीत.

  हे ही वाचा-‘2020 आयुष्यातील सर्वात वाईट काळ’; सुशांतच्या मृत्यूमुळं क्रिती झाली भावनाविवश

  या जाहिरातीसंदर्भात एकदा बोलताना पूजाने सांगितलं होतं, की ज्या पद्धतीने ते फोटोशूट झालं होतं, ते खूपच आश्चर्यकारक आणि प्रभावी होतं. त्या जाहिरातीचं शूटिंग गोव्यात झालं होतं. 'जेव्हा मी ती जाहिरात साइन केली होती, तेव्हा मला सांगण्यात आलं होतं, की मी शॉवर घेताना जाहिरातीत दाखवायचं आहे आणि मार्क रॉबिन्सन नौकेत बसलेले असतील. ते सगळं करण्यात मला काहीही अडचण नव्हती. पण जेव्हा मी स्टुडिओत पोहोचले, तेव्हा मी पाहिलं, की मार्क तिथे आधीच आलेले होते. तेव्हा मी त्यांना विचारलं, की तुम्ही स्टुडिओत काय करत आहात? त्यानंतर मला कळलं, की त्या जाहिरातीत ते माझ्यासोबत शॉवरखाली आंघोळ करत असल्याचं दाखवायचं होतं. मला सांगण्यात आलं होतं, की मला मार्कला हँड शॉवरने आंघोळ घालायची आहे. हे सगळं ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला होता. अर्थात, हे सगळं करण्यात मला काहीही अडचण वाटली नव्हती,' असं पूजाने सांगितलं होतं.

  पूजाची ही कंडोमची जाहिरातच नव्हे, तर अशा आणखीही अनेक जाहिरातींवरून वाद झाले होते आणि नंतर त्या जाहिरातींवर बंदी (Ban) आणण्यात आली होती.

  First published:
  top videos

   Tags: Bold photoshoot