मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Covid-19 positive असूनही 'या' अभिनेत्रीनं दिला व्हॅक्सिन घेण्यास नकार

Covid-19 positive असूनही 'या' अभिनेत्रीनं दिला व्हॅक्सिन घेण्यास नकार

Pooja Bedi

Pooja Bedi

अभिनेत्री पूजा बेदी (Pooja Bedi ) कोरोना पॉझिटीव्ह (Covid-19 positive) आढळली आहे. तिच्यासोबत तिचा भावी पती आणि तिची मोलकरीण यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

    नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसापासून कोरोनाची परिस्थिती पाहता कोरोनाचा विळखा सैल होत चालला आहे. पहिल्या व दुस-या लाटेत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. आता कोरोना रूग्णांचे प्रमाण कमी झाले असताना पुन्हा एकदा बॉलिवूडकरांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री पूजा बेदी (Pooja Bedi ) कोरोना पॉझिटीव्ह (Pooja Bedi tests Covid-19 positive) आढळली आहे. विशेष म्हणजे, पूजा बेदीने आत्तापर्यंत कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही. किंबहुना लस घेण्याचा तिचा इरादाही नाही. पूजाने स्वत: ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती दिली आहे.

    अभिनेत्रीने पूजा बेदीनं एक व्हिडिओ शेअर करून ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती चाहत्यांना दिली. सुरुवातीला आपला खोकला अॅलर्जीचा असल्याचं तिला वाटलं होतं. मात्र, नंतर तापदेखील आल्यानं पूजानं कोरोनाची टेस्ट करून घेतली तर ती पॉझिटिव्ह आली. या शिवाय तिचा भावी पती आणि हाउसकिपर देखील संक्रमित झाले असल्याची माहिती पूजा बेदीनं दिली.

    सध्या आपण आवश्यक ती सर्व काळजी घेत असून व्हॅक्सिन घेण्याचं टाळल असल्याचही तिने सांगितलं आहे. आपल्या नैसर्गिक रोग प्रतिकारकशक्तीच्या (Natural Immunity) मदतीनंच व्हायरसचा सामना करण्याची आपली इच्छा असल्याचं पूजानं व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. व्हिडिओच्या शेवटी तिनं सर्वांना निरोगी आणि सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिचे चाहते तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

    अभिनेत्री पूजा बेदी ही अभिनेता कबीर बेदी यांची मुलगी आणि अंगद बेदीची बहीण आहे. 'जो जिता वही सिंकदर' या चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली होती. याशिवाय तिनी ‘बिग बॉस’ आणि ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी’ या दोन रिअॅलिटी शोमध्ये देखील सहभाग घेतला होता. काही दिवसांपूर्वीच पूजानं एक मुलाखत दिली होती. त्यात तिनं सिंगल मदर असण्याचे आपले अनुभव व्यक्त केले होते. पूजानं आपल्या पहिला पती फरहान फर्निचरवाला याच्यापासून घटस्फोट घेतलेला आहे. तिला अलाया आणि ओमार ही दोन अपत्य आहेत.

    पूजा बेदीनं आपल्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही गोष्ट सर्वांनाच लागू होईल असं नाही. काही जणांसाठी कमी प्रमाणातील कोविड संसर्ग देखील घातक ठरू शकतो. त्यामुळं व्हिक्सिन घेणं कधीही चांगलंच.

    First published:
    top videos

      Tags: Big boss, Entertainment