पूजा बेदीच्या दुसऱ्या लग्नावर मुलगी आलियानं दिली प्रतिक्रिया, आईच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल म्हणाली...

पूजा बेदीच्या दुसऱ्या लग्नावर मुलगी आलियानं दिली प्रतिक्रिया, आईच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल म्हणाली...

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजा बेदीच्या मुलीनं तिच्या आईच्या दुसऱ्या लग्नाविषयी तिचं मत स्पष्ट केलं.

  • Share this:

मुंबई, 23 जानेवारी : सध्या बॉलिवूडचे स्टार किड्स वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. काहींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे तर काही पदार्पणाच्या मार्गावर आहेत. अशातच सध्या बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवालाच्या नावाची सुद्धा खूप चर्चा आहे. आलिया सैफ अली खानसोबत 'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. यातील आलियाच्या अभिनयाचं खूप कौतुकही झालं. सध्या ती सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. दरम्यान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं तिच्या आईच्या दुसऱ्या लग्नाविषयी तिचं मत स्पष्ट केलं.

बॉलिवूड पदार्पणाच्या अगोदर आलिया तिच्या सोशल मीडियावरील बोल्ड फोटोंमुळे बरीच चर्चेत होती. पण आता तिचा आगामी सिनेमा 'जवानी जानेमन'चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आलिया तिच्या अभिनयानं  सुद्धा सर्वांना इंप्रेस करेल असं बोललं जात आहे. नुकत्याच स्पॉटबॉय-ईला दिलेल्या एका मुलाखतीत तिनं तिच्या पर्सनल लाइफबद्दल बरेच खुलासे केले. यावेळी तिनं तिची आई पूजा बेदीचं दुसरं लग्न आणि तिचं आजोबा कबीर बेदी यांच्याशी नातं कसं आहे यावरही प्रतिक्रिया दिली.

निर्भयाच्या आईने केलं कंगनाचं समर्थन, म्हणाली मला महान व्हायचं नाहीये!

 

View this post on Instagram

 

A post shared by Alaya F (@aalia.ebrahim) on

पूजा बेदीनं फरहान फर्निचरवालापासून 2003 मध्ये घटस्फोट घेतला होता. मात्र त्यानंतर तिच्या आणि आलियाच्या नात्यात फार फरक पडला नाही. आलिया म्हणाली, ‘माझी आई गोव्यात राहते. मी माझे वडील आणि माझा सावत्र भाऊ यांना अनेकदा भेटायला जाते. ते सुद्धा माझी फॅमिली आहेत. त्यांचं माझ्यावर खूप प्रेमही आहे.’ तर  आई पूजा बेदीचा बॉयफ्रेंड मानेक कॉन्ट्रॅक्टर याच्याविषयी आलिया सांगते, ‘मानेक अंकल खूप चांगले आहेत. मी आणि माझा भाऊ ओमर आम्हाला दोघांनाही ते आवडतात. आई आणि त्यांचा साखरपुडा झाला आहे पण ते दोघं लग्न कधी करणार हे मात्र माहित नाही.’

प्रियांका चोप्रानं फंक्शनमध्ये केला मनिष मल्होत्राचा अपमान, VIDEO VIRAL

याशिवाय आलियानं तिच्या आईच्या आजोबा कबीर बेदी यांच्याशी असलेल्या नात्याबद्दलही खुलासा केला. ती म्हणाली, त्या दोघांमध्ये बरेच गैरसमज होते. पण त्यासाठी आईनं कधीच आजोबांना भेटण्यापासून मला थांबवलं नाही. आता मात्र या दोघांमधील मतभेद दूर झाले आहेत. या संपूर्ण मुलाखातीत आलियाचा बिनधास्त स्वभाव समोर आला. तिचा डेब्यू सिनेमा 'जवानी जानेमन' येत्या 7 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच दिवशी दिशा पाटनी आणि आदित्य रॉय कपूर यांचा 'मलंग' सिनेमाही रिलीज होत आहे त्यामुळे बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे.

एका जाहिरातीतून कमावतो तब्बत 11 कोटी, अभिनेत्याचं नाव ऐकून व्हाल हैराण

First published: January 23, 2020, 5:10 PM IST

ताज्या बातम्या