Home /News /entertainment /

वयाच्या 50 व्या वर्षीही बोल्डनेसमुळे चर्चेत असते ही अभिनेत्री, आई होती तिच्यापेक्षा बोल्ड

वयाच्या 50 व्या वर्षीही बोल्डनेसमुळे चर्चेत असते ही अभिनेत्री, आई होती तिच्यापेक्षा बोल्ड

मॉडेलिंग आणि वाद यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या या अभिनेत्रीची आई सुद्धा एका न्यूड फोटोशूटमुळे वादात सापडली होती.

    मुंबई, 11 मे : आमिर खानच्या जो जिता वही सिंकदर या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणारी अभिनेत्री पूजा बेदी नेहमीच तिच्या बोल्डनेमुळे चर्चेत असते. आज पूजाचा 50 वा वाढदिवस. पदार्पणचा सिनेमा हिट गेल्यानंतरही पूजा फिल्मी करिअर मात्र फारसं यशस्वी होऊ शकलं नाही. पण मॉडेलिंग आणि वाद यामुळे पूजा नेहमीच चर्चेत राहिली. याशिवाय तिचं लव्ह लाइफ प्रचंड चर्चेत राहिलं. तिनं आतापर्यंत पाच व्यक्तींना डेट केलं आहे. एवढंच नाही तर पूजाचे वडील कबीर बेदी यांनी 4 लग्नं केली असून त्यांची चौथी पत्नी पूजा पेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. सर्वात आधी पूजाच्या नावाची चर्चा झाली ती आदित्य पांचोलीसोबत. पण हे रिलेशनशिप फार काळ चाललं नाही. यानंतर ती फरहान फर्नीचरवालासोबत तीन वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनी 1994 मध्ये लग्नही केलं. पण लग्नाच्या काही वर्षांनंतरच दोघांमध्ये भांडण होऊ लागली आणि 2003 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. फरहानपासून पूजाला ओमार आणि आलिया ही दोन मुलं आहेत. यानंतर पूजा कोरिओग्राफर हनीफ हिलाल याला दोन वर्ष डेट केलं, पण इतर नात्यांप्रमाणे हे नातंही फार काळ टिकू शकलं नाही. द्विती विक्रमादित्यशीही पूजाचं 18 महिन्यांचं नातं राहिलं. या सगळ्यानंतर पूजाने बिग बॉस सिझन 5 दरम्यान स्पर्धक आकाशदीप सहगलला डेट केलं. आकाशदीप ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ मालिकेत अंशची भूमिका साकारली होती. पूजाच्या आईबद्दल बोलायचं तर त्या तिच्यापेक्षाही बोल्ड होत्या. एक वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, पूजाचे वडील कबीर बेदी यांचा साखरपुडा अंबा सन्याल नावाच्या एका मुलीशी झाला होता. मात्र दरम्यानच्या काळात ते प्रोतिमा गुप्ता नावाच्या 19 वर्षीय मॉडेलच्या प्रेमात पडले आणि ती त्यांच्यापासून गरोदर राहिली. त्यामुळे कबीर यांनी अंबा संन्यालशील साखरपुडा मोडून प्रोतिमाशी लग्न केलं. लग्नानंतर पूजाचा जन्म झाला. सलमानसोबत काम करण्यास किंग खानचा नकार, शाहरुखनं सोडला बिग बजेट सिनेमा एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार पूजा बेदीच्या जन्माच्या 8 महिन्यांनंतर तिच्या आईच म्हणजे प्रतिमाचं अफेअर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या जर्मन मुलाशी होतं ज्यामुळे कबीर आणि प्रोतिमा यांच्यात वाद होऊ लागले आणि अखेर लग्नाच्या 4-5 वर्षांतच ते दोघं वेगळे झाले. प्रोतिमा एक मॉडेल आणि क्लासिकल डान्सर होत्या. मात्र काही काळानंतर त्या सर्वकाही सोडून संन्यासाच्या मार्गाला लागल्या आणि कैलाश मानसरोवरच्या यात्रेमध्ये त्यांचा लँड स्लाइडमध्ये मृत्यू झाला. 1974 मध्ये प्रोतिमा यांचा न्यूड फोटो सिनेब्लिट्स मासिकावर छापून आला. या मासिकाला आपल्या प्रसिद्धीसाठी एका बोल्ड मुलीची गरज होती. जी न्यूड धावून पोज देईल. जेव्हा मासिकाच्या संपादकांनी प्रोतिमाकडे यासाठी संपर्क केला तेव्हा ती त्या यासाठी तयार झाल्या. यासाठी त्या मुंबईच्या बीचवर न्यूड धावल्या होत्या. ज्यावरुन नंतर बरेच वाद झाले. फक्त पूजा आणि तिची आईच नाही तर तिचे वडील कबीरही त्यांच्या वेगवेगळ्या रिलेशनशिपमुळे नेहमी वादात अडकले होते. कबीर यांनी वयाच्या 70 व्या वर्षी 43 वर्षीय परवीन दुसांजशी लग्न केलं. पूजा ही परवीनपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे. पूजाला वयाच्या 48 व्या वर्षी अखेर तिचा जीवनसाथी मिळाला आहे. पूजाने 2018 च्या व्हॅलेंटाइन डेला व्यावसायिक मानेक कॉन्ट्रॅक्टरशी साखरपुडा केला होता. पूजाने सोशल मीडियामार्फत आपल्या साखरपुड्याची बातमी सर्वांना सांगितली होती.पूजा आणि मानेक यांचं एकत्रच शिक्षण झालं होतं. गोव्याचे राहणारे मानेक शाळेमध्ये पूजापेक्षा तीन वर्षांनी सिनिअर होते. पूजा जेवढी बोल्ड आहे तेवढीच बोल्ड तिची मुलगी अलाया फर्नीचरवालाही आहे. अलाया बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. तिचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग आहे. तिनं यावर्षीच सैफ अली खानसोबत 'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं. ज्यात तिनं एका बोल्ड आणि बिनधास्त मुलीची भूमिका साकारली होती. लॉकडाऊनमध्ये अभिनेत्री सापडली आर्थिक अडचणीत, घर चालवायलाही नाहीत पैसे शाहरुख खानसोबत Video Call वर बोलण्याची संधी, पण करावं लागेल हे काम
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Pooja bedi

    पुढील बातम्या