वयाच्या 42 वर्षी या अभिनेत्रीनं गुपचुप उरकलं लग्न? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

वयाच्या 42 वर्षी या अभिनेत्रीनं गुपचुप उरकलं लग्न? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मागच्या काही काळापासून मीडियापासून दूर असेलेली ही अभिनेत्री वयाच्या 42 व्या पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : एकेकाळी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री पूजा बत्राच्या बाबतीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागच्या काही काळापासून मीडियापासून दूर असेलेली ही अभिनेत्री वयाच्या 42 व्या पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकली आहे. मागच्या काही काळापासून तिच्या अफेअर्सच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. पण ती अशी अचानक लग्न करेल याची कोणालाही कल्पना नव्हती. पूजानं ज्या व्यक्तीशी लग्न केलं आहे. तो बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता असून त्यानं अनेक बिग बजेट सिनेमांमध्ये दिसला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या दोघांनी लग्न केलं असल्याचं बोललं जात आहे. मात्र पूजानं याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

अभिनेत्री पूजा बत्रानं 2002 मध्ये सर्जन डॉक्टर सोनू अहलूवालियाशी लग्न केलं होतंं. त्यानंतर ती अमेरिकेला स्थायिक झाली होती. मात्र त्यांचं हे लग्न जास्त दिवस टिकू शकलं नाही. लग्नाच्या जवळपास 9 वर्षांनंतर सोनू आणि पूजा वेगळे झाले. घटस्फोट झाल्यानंतर बऱ्याच काळानं पूजाची ओळख बॉलिवूड अभिनेता नवाब शाहसोबत झाली आणि त्यांची मैत्री नंतर प्रेमात बदलली. त्यानंतर या दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर केले होते. जेव्हा पासून त्यांच्या लग्नाची बातमी समोर आली आहे तेव्हा पासून या दोघांचे फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहेत.

SPECIAL REPORT : 'द लायन किंग' शाहरुखसाठी का आहे महत्त्वाचा?

 

View this post on Instagram

 

Sea Sun Sand and a scorpion ❤️

A post shared by Nawab Shah (@nawwabshah) on

नुकताच स्पॉटबाय-ई या पोर्टलनं पूजा आणि नवाबनं गुपचुप लग्न केल्याचा दावा केला आहे. स्पॉटबाय-ईनं दिलेल्या वृत्तानुसार पूजा आणि नवाब यांनी काश्मीरमध्ये लग्न केलं आहे. यावर्षी ईदच्या निमित्तानं नवाबसोबत फोटो शेअर करत पूजानं त्यांचं नातं ऑफिशियल केलं होतं. याशिवाय नवाबनं सुद्धा एक फोटो शेअर केला होता ज्यात त्यानं मला वयाच्या 42 व्या वर्षी माझी सोलमेट मिळाली असं कॅप्शन दिलं होतं. याशिवाय त्यानं नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोमध्ये पूजाच्या हातात चुडा आणि मेंदी दिसत आहे.

तुमच्या लाडक्या कलाकारांचे लहानपणचे फोटो ओळखता येतायत का?

 

View this post on Instagram

 

It took 46 years for my soul to be Ready , and then my mate appeared . Eid Mubarak soulmate ❤️ . Eid Mubarak to all

A post shared by Nawab Shah (@nawwabshah) on

View this post on Instagram

Beard kaishi hsi ???

A post shared by Nawab Shah (@nawwabshah) on

अभिनेत्री पूजा बत्रा माजी फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल आहे. तिनं बॉलिवूडच्या 'विरासत', 'नायक', 'हसीना मान जाएगी', 'भाई', 'फर्ज' और 'एबीसीडी 2' या सिनेमामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तर नवाब सुद्धा 'भाग मिल्खा भाग', 'डॉन 2', 'दिलवाले' 'टाइगर जिंदा है' या सिनेमांध्ये दिसला आहे. याशिवाय लवकरच तो समानच्या 'दबंग 3'मध्येही दिसणार आहे.

आपण यांना ओळखलंत का? या अभिनेत्याच्या फोटोनं Throwback ला उधाण

==========================================================

VIDEO: विठुरायाच्या दरबारात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

First published: July 12, 2019, 10:35 AM IST

ताज्या बातम्या