मुंबई, 15 जुलै- बॉलिवूड अभिनेत्री पूजा बत्राने वयाच्या 42 व्या वर्षी दुसरं लग्न केलं. अभिनेता नवाब शहाशी तिने गुपचूप लग्न केलं. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. लग्न होईपर्यंत पूजाने आपल्या नात्याबद्दल कुठेच वाच्यता केली नव्हती. पण आता मात्र ती लग्न आणि नवऱ्याबद्दल खुलेपणाने बोलताना दिसते.
बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पूजा म्हणाली की, ‘हो आम्ही लग्न केलं. आम्ही दोघांनी दिल्लीत लग्न केलं. या लग्नात फक्त आमचे कुटुंबातले सदस्यच होते. माझे मित्र- मैत्रिणी मला सतत विचारत होते की, लग्नाला एवढा उशीर का केला? मी फार साधं आयुष्य जगत होते. तेव्हा मला जाणीव झाली की हा तोच माणूस आहे ज्याच्यासोबत मला उर्वरीत आयुष्य काढायला आवडेल. यानंतर लग्न टाळण्याचा कधी प्रश्नच आला नाही. आम्ही आर्य समाज मंदिरात लग्न केलं. या आठवड्यात आम्ही आमचं लग्न रजिस्टर करून घेऊ.’
पूजा आणि नवाब गेल्या पाच महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अवघ्या काही महिन्यात लग्नाचा विचार केल्याबद्दल बोलताना पूजा म्हणाली की, ‘मी नवाबला आधापासून ओळखत होते. मात्र याच वर्षी फेब्रुवारीमध्ये कॉमन फ्रेंडमार्फत आमची ओळख झाली. मला वाटतं की आम्ही योग्यवेळी पुन्हा एकदा भेटलो. भावनिकरित्या आम्ही एकसारखाच प्रवास करत होतो. त्यामुळे एकमेकांच्या पटकन जवळ आलो.’
पूजा पुढे म्हणाली की, ‘मी नेहमीच नवाबचा आदर राखला. या काळात मी त्याला चांगल्या पद्धतीने समजू शकले. मला तो आवडायचा. त्यामुळे माझ्या मनात सतत एक प्रश्न यायचा की आमच्यात मैत्रीपेक्षा जास्त काही होऊ शकतो का? आम्ही भावनिक आणि वैचारिकदृष्ट्या फार सारखे आहोत. आम्हाला एकमेकांना गोष्टी समजावून सांगायची फारशी गरज पडत नाही.’
सलमानने केली ही कृती की, नेटीझन्स म्हणाले- 'तूच का खरा मुसलमान?'
War Teaser: ज्याला आयडॉल मानलं त्याच्याच विरुद्ध उभा राहिला टायगर श्रॉफ
...म्हणून अक्षय कुमारचा मुलगा क्रिकेटचा द्वेष करतो
VIDEO: सलमान खानने केलं 'Bottle Cap Challenge'; सगळ्यांची बोलती झाली बंद!