अक्षय कुमारसोबत होतं अफेअर, ब्रेकअपनंतर अभिनेत्रीनं बॉलिवूडला केलं गुडबाय

अक्षय कुमारसोबत होतं अफेअर, ब्रेकअपनंतर अभिनेत्रीनं बॉलिवूडला केलं गुडबाय

हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. इतकंच नाही तर अक्षयचं करिअर सावरण्यात तिनं त्याला बरीच मदत केली होती.

  • Share this:

मुंबई, 27 ऑक्टोबर : 90 व्या दशकात जेव्हा जूही चावला, रवीना टंडन, माधुरी दीक्षित आणि शिल्पा शेट्टी या अभिनेत्री बॉलिवूडवर राज्य करत होत्या अशातच एका अभिनेत्रीनं आचानक सर्वांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं होतं. या अभिनेत्रीचं नाव होतं पूजा बत्रा. या अभिनेत्रीला पाहिल्यावर सर्वांनाच असं वाटत होतं की ही आता सर्वांवर भारी पडणार. मिस इंडिया-एशिया पॅसिफिक असलेल्या पूजानं विरासत या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात पूजासोबत तब्बू सारखी टॅलेंटेड अभिनेत्री होती. तिच्या मानानं पूजाची भूमिका फार लहान होती मात्र तिच्या अभिनयानं सर्वांना जिंकलं.

बॉलिवूडमध्ये हळूहळू पूजाच्या यशाचा आलेख उंचावत चालला होता आणि ती बाकी स्टार्सची पहिली पसंती होत चालली होती. पूजानं तिच्या करिअरमध्ये अनिल कपूर, गोविंदा, संजय दत्त आमि अक्षय कुमार सारख्या कलाकारांसोबत काम केलं. पण कालांतरानं अक्षयसोबत पूजाच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. या दोघांबद्दल अनेक मासिकं आणि वृत्तपत्रांमधून लिहिलं जात होतं, बोललं जात होतं.

VIDEO : करिश्मा कपूरच्या गाण्यावर टायगरचा धम्माल डान्स, वाचा काय म्हणाली दिशा

 

View this post on Instagram

 

♥️

A post shared by Pooja Batra Shah (@poojabatra) on

मात्र याचा या दोघांवर काहीच फरक पडला नाही. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. दरम्यान अक्षयचं करिअर सावरण्यात पूजानं त्याला बरीच मदत केली. सर्वकाही ठिक चाललं होतं प्रोफेशन आणि पर्सनल लाइफ व्यवस्थित चालली होती. मात्र काही काळातच त्यांचं ब्रेकअप झालं. असं म्हणतात की, दुसऱ्या कोणाशी अफेअर सुरू झाल्यानं अक्षयनं पूजाला सोडलं. त्यामुळे या पूजा पूर्णपणे तुटली.

किती गोड! अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या या लहानगीचा क्यूट VIDEO एकदा पाहाच

 

View this post on Instagram

 

Mi Amor

A post shared by Pooja Batra Shah (@poojabatra) on

या ब्रेकअप नंतर पूजानं बॉलिवूडला गुडबाय केलं आणि ती अमेरिकेला रवाना झाली. काही काळानं तिनं एका एनआरआय मुलाशी लग्न केलं आणि लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाली. अभिनय सोडून तिनं स्वतःला समाजसेवेमध्ये वाहून घेतलं. पूजानं मुक्ति फाउंडेशनच्या माध्यमातून एड्स, बेघर मुलं यांची मदत केली. याशिवाय या फाउंडेशमधून काश्मीरमध्ये जखमी झालेल्या जवानांना तिनं मदत केली. पहिल्या पतीसोबत पूजाचं नातं फार काळ टिकलं नाही. 8 वर्षांनी हे दोघं वेगळे झाले. त्यानंतर 4 जुलैला तिनं अभिनेता नवाब शाहसोबत लग्न केलं.

हे आहेत बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते, सलमानची फी ऐकून व्हाल थक्क!

=====================================================================

VIDEO : मंदीत 'संधी'? ठाण्यात चक्क सोन्याची मिठाई, किंमत...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2019 11:02 AM IST

ताज्या बातम्या