मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

साऊथ अभिनेता विक्रमची तब्येत बिघडली; हृदयासंबंधित त्रासामुळे रुग्णालयात दाखल

साऊथ अभिनेता विक्रमची तब्येत बिघडली; हृदयासंबंधित त्रासामुळे रुग्णालयात दाखल

 बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या 'पोन्नियिन सेलवन पार्ट 1' सिनेमातील तिचा सहकलाकार साऊथ अभिनेता चियान विक्रम याची तब्येत बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा होता मात्र त्याधीच अभिनेत्याची तब्येत बिघडल्याचं एकच खळबळ उडाली.

पुढे वाचा ...
  मुंबई, 08 जुलै: साऊथ सिनेसृष्टीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. साऊथ अभिनेता चियान विक्रम (Vikram heart attack) याला चेन्नईच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हृदयासंबंधित त्रासामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याची एंन्जिओग्राफी करण्यात आली आहे. अभिनेत्याचं वय 56 वर्ष असल्यानं त्याच्या प्रकृतीची सध्या सगळेच चिंता व्यक्त करत आहेत.  अभिनेत्याच्या मॅनेजरनं ही माहिती ट्विटरच्या माध्यामातून त्याच्या चाहत्यांना दिली आहे. विक्रमच्या मॅनेजरनं दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याची प्रकृती आता ठिक आहे. तो डॉक्टरांच्या निगराणीखाली असून लवकरच त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल. तरीही अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत कोणत्याही अफवा पसरवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. आजतकनं दिलेल्या वृत्तानुसार,  अभिनेता विक्रमला 8 जुलै रोजी त्याचा आगामी सिनेमा 'पोन्नियिन सेलवन पार्ट 1' च्या ( Ponniyin Selvan part 1 Trailer) ट्रेलर लाँच सोहळ्याला उपस्थित राहायचं होतं. ट्रेलर लाँच सोहळा चेन्नईमध्येच संपन्न होणार आहे.  या सिनेमात अभिनेता विक्रम प्रमुख भूमिकेत आहे. इपिक ड्रामा असलेल्या या सिनेमाचे दोन पार्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिनेमाचं खास वैशिष्ट्ये म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya co star Vikram heart attack)  या सिनेमातून तब्बल 4 वर्षांनंतर कमबॅक करणार आहे. हेही वाचा - VIDEO: रणबीर घेतोय 'अनुपमा' फेम अभिनेत्रीकडून बेस्ट बाबा बनण्याचं ट्रेनिंग! अभिनेता विक्रमच्या मॅनेजर सूर्यानारायणनन यांनी म्हटलंय,  'प्रिय फॅन्स आणि वेलविशर्स, चियान विक्रमच्या छातीत दुखत होते. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला नाही. त्यांच्याविषीय चुकीची माहिती देण्यात येत आहे. सगळ्यांना विनंती आहे की त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला वैयक्तिक वेळ द्यावा. आपले विक्रम ठिक आहेत. त्यांना 1-2 दिवसात हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल. या स्टेटमेंटनंतर त्यांच्या प्रकृतीविषयीची खरी माहिती मिळाली असेल अशी आशा आहे. कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका'. अभिनेता विक्रमच्या वक्र फ्रंट विषयी सांगायचं झालं 'महान' हा त्याचा शेवटचा सिनेमा ठरला. ओटीटी प्लॅटफॉर्म यंदा त्याचा एकही सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. महान या सिनेमात अभिनेत्यानं त्याचा मुलगा ध्रुवबरोबर स्क्रिन शेअर केली होती.  अभिनेता विक्रमनं तमिळ, तेलुगु आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये काम केलं आहे. 2004 साली त्याला राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.  अभिनेत्याची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: South film, South indian actor

  पुढील बातम्या