सुशांत प्रकरणाच्या तपासावरून आता राजकारण; भाजपचं आंदोलन तर अजित पवारांची आयुक्तांबरोबर चर्चा

सुशांत प्रकरणाच्या तपासावरून आता राजकारण; भाजपचं आंदोलन तर अजित पवारांची आयुक्तांबरोबर चर्चा

बिहारच्या IPS अधिकाऱ्याला होम क्वारंटाईन केल्याच्या निषेधार्थ मुंबईच्या आयुक्तालयासमोर भाजपने आंदोलन केलं. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेट दिल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 3 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला दररोज नवं वळण मिळत आहे. आता या प्रकरणाच्या तपासावरून राजकारण सुरू झालं आहे. बिहारच्या IPS अधिकाऱ्याला होम क्वारंटाईन केल्याच्या निषेधार्थ मुंबईच्या आयुक्तालयासमोर भाजपने आंदोलन केलं. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेट दिल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी बिहार पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असं चित्र रंगवण्यात येत आहे. त्यात सुशांत प्रकरणाची चौकशी करायला मुंबईत पोहोचलेल्या IPS अधिकाऱ्याला मुंबई महापालिकेने होम क्वारंटाईचा शिक्का मारून घराबाहेर पडण्यास बंदी घातली गेल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे.

भाजपचे मुंबई महापालिकेतले नगरसेवक या प्रकरणी आंदोलनाच्या पवित्र्यात असून ते यासंंबंधी मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांची भेट घेणार आहेत. त्याच वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचीही भेट घेतली.

मंत्रालयात अजित पवार यांच्या दालनातच पोलीस आय़ुक्तांनी सुमारे 20 मिनिटं त्यांच्याशी चर्चा केली. नेमकी कशासाठी भेट घेतली याचं कारण परमबीर सिंग यांनी किंवा मुंबई पोलिसांनी स्पष्ट केललं नाही. पण आता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासावरून राजकारण सुरू असल्याचं स्पष्ट आहे.

मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी कोणाच्या आदेशावरून बिहारच्या पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन व्हायला सांगितलं हे स्पष्ट करा, अशी भाजप नगरसेवकांची मागणी आहे.

दररोज मुंबईत हजारो लोक वैध- अवैध मार्गाने येतात. त्या सगळ्यांना क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी का बसवलं जात नाही, असा भाजपचा सवाल आहे.

दरम्यान, बिहार पोलिसांकडून रिया बेपत्ता असल्याची बातमी समोर येताच तिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी याबाबत स्टेटमेंट जारी केलं आहे. बिहार पोलिसांकडून रिया चक्रवर्तीच्या चौकशीसाठी प्रयत्न केले जात होते. मात्र ती सापडली नाही. यानंतर पोलिसांनी रिया चक्रवर्ती गायब असल्याचे म्हटले होते. या आरोपानंतर रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी एक स्टेटमेंट जारी केलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की - रिया चक्रवर्ती बेपत्ता असल्याचा बिहार पोलिसांचा आरोप चुकीचा आहे. रियाचा जबाब मुंबई पोलिसांकडून नोंदविण्यात आला आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 3, 2020, 4:39 PM IST

ताज्या बातम्या