देवाची इच्छा असेल तर मी राजकारणात येईन - रजनीकांत

देवाची इच्छा असेल तर मी राजकारणात येईन - रजनीकांत

'सध्या देवाची इच्छा आहे की मी लोकांचं मनोरंजन करावं.जर देवाला वाटलं की मी राजकारणात यावं, तर मी येईन,' असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.

  • Share this:

15 मे : सुपरस्टार रजनीकांत भविष्यात राजकारणात आले, तर आश्चर्य वाटायला नको. कारण तसं त्यांनी आज बोलून दाखवलं. 'सध्या देवाची इच्छा आहे की मी लोकांचं मनोरंजन करावं.जर देवाला वाटलं की मी राजकारणात यावं, तर मी येईन,' असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. रजनीकांत आपल्या फॅन्सना 8 वर्षांनी भेटले. तेव्हा त्यांनी आपलं मनोगत दिलखुलासपणे सांगितलं.

'पण राजकारणात मी वाईट लोकांशी युती करणार नाही, त्यांना जवळही येऊ देणार नाही. राजकारण हा पैसा कमवायचा नाही, तर लोकांची सेवा करायचा मार्ग आहे. मी 1996  साली द्रमुकला पाठिंबा दिला होता, तो एक राजकीय अपघात होता,' असंही ते म्हणाले.

2014 साली नरेंद्र मोदींनी तलैवांची भेट घेतली होती. पण भेटीत राजकारणावर चर्चा झाली नाही, असं मोदी तेव्हा म्हणाले होते.

रजनीकांत यांचा पुढचा सिनेमा हाजी मस्तान यांच्या आयुष्यावर आधारित आहे, अशी चर्चा होती. पण तो सिनेमा हाजी मस्तानवर नाही असंही ते म्हणाले.

First published: May 15, 2017, 3:57 PM IST

ताज्या बातम्या