प्रियांका चोप्राला पोलिसांनी का उचलून नेलं?

प्रियांका चोप्राला पोलिसांनी का उचलून नेलं?

या फोटोत पोलीस प्रियांकाला अक्षरश: उचलून नेतायत. तेही अमेरिकन पोलीस.

  • Share this:

03नोव्हेंबर : प्रियांका चोप्रा सध्या तिच्या प्रसिद्ध टीव्ही शो 'क्वांटिको'च्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगच्या तयारीत आहे. त्यासाठी ती न्यूयॉर्कमध्ये आहे. पण आता काय केलं प्रियांकाने की तिला पोलिसांनी पकडलं, असं हे फोटो पाहून तुम्हालाही नक्कीच वाटल असणार. या फोटोत पोलीस प्रियांकाला अक्षरश: उचलून नेतायत. तेही अमेरिकन पोलीस.

खरं तर हा सीन शूटिंगचा आहे. या फोटोमध्ये अमेरिकेचे पोलीस प्रियांकाला उचलून पोलीस व्हॅनमध्ये टाकत आहेत. या शोमध्ये प्रियांका एफबीआय (Federal Bureau of Investigation) ची सदस्य आहे. त्याचाच एक सीन शूट करताना हे फोटो काढले गेले आहे.

या फोटोंवरून असं दिसतंय की या 'क्वांटिको' च्या तिसऱ्या सीझनमध्ये काही खास असणार आहे. त्यामुळे प्रियांकाच्या चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.

नुकताच न्यूयॉर्कमध्ये झालेल्या हल्ल्यात अनेक जण ठार झाले. प्रियांकाचं घर हल्ला झालेल्या ठिकाणीच आहे. त्यामुळे ती खूप दु:खी झाली आणि तिने ट्विटरवरून देशाच्या अवस्थेवर दु:खही व्यक्त केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2017 04:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading