News18 Lokmat

‘तुझ्यात जीव रंगला’मधील राणादाच्या वडिलांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

आपली एक मालमत्ता विक्री करायची असून त्यातून ३ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे ही रक्कम दागिन्यात गुंतवायची असल्याचे मिलिंद आणि त्यांच्या पत्नीने सांगितले.

News18 Lokmat | Updated On: Jun 15, 2019 01:14 PM IST

‘तुझ्यात जीव रंगला’मधील राणादाच्या वडिलांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

पुणे, 15 जून- 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील राणादादाचे वडील मंत्री प्रतापराव गायकवाड अर्थात अभिनेते मिलिंद दस्ताने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएनजी ज्वेलर्सची फसवणूक केल्याप्रकरणी दस्ताने दाम्प्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षय गाडगीळ यांनी या प्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिलिंद दस्ताने आणि त्यांची पत्नी सायली दस्ताने यांनी पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या औंध येथील दुकानातून २५ लाख रुपयांच्या दागिन्यांची खरेदी केली होती.


मात्र, या खरेदी केलेल्या दागिन्यांचे त्यांनी वर्षभरानंतरही पैसे दिले नाहीत. आपली एक मालमत्ता विक्री करायची असून त्यातून ३ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे ही रक्कम दागिन्यात गुंतवायची असल्याचे मिलिंद आणि त्यांच्या पत्नीने सांगितले. त्यांनी २५.६९ लाख किंमतीचे एक किलो सोन्याचे दागिने खरेदी केले. मात्र, रक्कम एकत्रित देण्याऐवजी हप्त्यांवर देणार असल्याचे सांगितले. पण वर्षभरानेही त्यांनी थकलेली रक्कम न दिल्याने शेवटी गाडगीळ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यासंदर्भात मिलिंद दस्ताने यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

हेही वाचा-

तैमुरला सोडा, लिसा रेच्या एक वर्षाच्या जुळ्या मुलींचे फोटो पाहिलेत का?

Loading...

चक्क पाकिस्तानवरून ऋषी कपूर यांना भेटायला गेली अभिनेत्री, लोकांनी केल्या कमेंट

याच कारणामुळे प्रियांका चोप्राच्या दिराच्या बॅचलर पार्टीमध्ये तीनवेळा आले पोलीस

World Cup: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यावर पावसाचं ग्रहण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 15, 2019 01:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...