ढिंच्याक पूजावर झाली 'पोलीस केस'

ढिंच्याक पूजावर झाली 'पोलीस केस'

सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तिची कोणीतरी पोलिसात तक्रार केलीय

  • Share this:

29 जून :सध्याची सोशल मीडियावरील अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे ढिंच्याक पूजा. तिची गाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली असतानाच सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तिची कोणीतरी पोलिसात तक्रार केलीय.

सध्या पूजा तिच्या 'दिलो का शुटर है मेरा स्कुटर' या नवीन गाण्यावरून प्रचंड ट्रोल केली जातेय.या गाण्यात ती व्हेस्पा स्कुटर चालवताना दिसतेय.पण गंमत अशी की या गाण्यात स्कुटर चालवताना तिनं हेल्मेट घातलंच नाही.त्यात दिल्लीच्या रस्त्यावर ती मोठ्यामोठ्यानं गाणी म्हणत दंगा ही करतेय.

हीच बाब ध्यानात घेऊन मोहित सिंह नावाच्या गृहस्थांनी दिल्ली पोलिसांकडे ट्विटरवर ट्विट करून तक्रार केली .हेल्मेट न घालता ही सुरज विहार भागात फार दंगा करत गाणी म्हणतेय असं त्यांचं म्हणणं आहे .आणि पोलिसांनीसुद्धा त्यांच्या या ट्विटला लगेच उत्तर दिलंय.यासंदर्भात कारवाई केली जाईल असं दिल्ली पोलिसांनी ट्विट करून सांगितलंय.

आता दिल्ली पोलीस पूजावर काय कारवाई करतील आणि त्यावरून पूजा किती ट्रोल होईल हे येणारा काळच सांगेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2017 12:36 PM IST

ताज्या बातम्या