मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

प्रसिद्ध गायकाकडून 21 किलो गांजा जप्त, पोलिसांची मोठी कारवाई

प्रसिद्ध गायकाकडून 21 किलो गांजा जप्त, पोलिसांची मोठी कारवाई

फिल्मी स्टाईलनं गायकाला पकडलं, 21 किलो गांजा जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

फिल्मी स्टाईलनं गायकाला पकडलं, 21 किलो गांजा जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

फिल्मी स्टाईलनं गायकाला पकडलं, 21 किलो गांजा जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

    दिल्ली : गायकावर गांजा प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. १०० हून अधिक गाणी गायलेल्या भोजपुरी गायकाला ताब्यात घेतलं आहे. दिल्लीतील इंदरपुरी भागातून पोलिसांनी अटक केली. या गायकाकडून 21 किलो गांजा जप्त केला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय शर्मा असे या व्यक्तीचे नाव आहे. जो मूळचा बिहारमधील सिवानचा रहिवासी आहे. विनय हा भोजपुरी गायक आहे. त्याने आतापर्यंत 100 हून अधिक गाणी गायली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारकोटिक्स विभागाला ड्रग्स प्रकरणाची माहिती मिळाली होती. त्यामुळे नारकोटिक्स स्क्वॉडचे अधिकारी संदीप आणि एएसआय करण सिंह आपली टीम घेऊन त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी फिल्मी स्टाईलने विनयला पकडलं. विनयची सध्या चौकशी सुरू आहे. त्याच्यावर इंदरपुरी इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा कुठून आणला आणि तो कुठे नेणार होता या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Delhi News, Delhi Police

    पुढील बातम्या