Home /News /entertainment /

अभिनेत्रीनं केला पोल डान्स, BOLD VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

अभिनेत्रीनं केला पोल डान्स, BOLD VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

अभिनेत्रीने एक पोल डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून तो व्हायरल होताना दिसत आहे.

  मुंबई, 12 मे : कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन सध्या सर्वांनाच घरी राहावं लागतं आहे. नेहमी बीझी शेड्यूलची तक्रार करणाऱ्या सेलिब्रेटींकडे सुद्धा आता बराच रिकामा वेळ आहे. ज्यात सर्वजण आपले आवडते छंद जोपासताना आणि सोशल मीडियावरून चाहत्यांशी संवाद साधताना किंवा त्यांचं मनोरंजन करताना दिसत आहेत. त्यामुळे त्याने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अभिनेत्री कृती खरबंदाच्या बाबतीत असाच काहीसं झालं आहे. तिनं नुकताच एक पोल डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जो खूप व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये कृतीचा बोल्ड अंदाज पाहून सर्वच हैराण झाले आहेत.  कृती सध्या तिचा लॉकडाऊनचा काळ बॉयफ्रेंड पुलकित सम्राट सोबत स्पेन्ड करताना दिसत आहे. तिने इन्स्टाग्रामवर पुलकित सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.  त्यानंतर आता तिचा पोल डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  या व्हिडिओतील तिचा डान्स पाहून सर्वच हैराण आहेत.
  या व्हिडिओमध्ये कृती ब्लॅक आऊटफिट्समध्ये डान्स करताना दिसत आहे.  हा व्हिडिओ शेअर करताना कृतीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, माझ्या आवडीचं वर्कआऊट. आता मला घरी पोल नसल्याचा खूप पश्चाताप होतोय. माझ्या ‘टू डू’ लिस्टमध्ये मी आता ही गोष्ट समाविष्ट करत आहे. तुमच्या लिस्टमध्ये अशी कोणती गोष्ट तुम्हाला करायची आहे आणि कोणती गोष्ट करणं तुम्ही आता सर्वाधिक मिस करत आहात. हे वाचा : ‘आजचा दिवस खास आहे..’ इरफान खानच्या आठवणीत दीपिका झाली भावूक, शेअर केली ही कविता लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कृती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तिने एक फोटो शेअर करत प्रॉन्स करी तयार केल्याचं सांगितलं होतं. याशिवाय तिचा COVID BROWS वाला व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला होता. ज्यात ती लॉकडाऊनच्या काळात तिच्या आयब्रोची काय अवस्था झाली हे सांगताना दिसली होती. हे वाचा : आठशे खिडक्या नऊशे दारं! लॉकडाऊनमध्ये शूट केली नवी मालिका, पाहा VIDEO संपादन - मेघा जेठे
  Published by:Suraj Yadav
  First published:

  Tags: Coronavirus

  पुढील बातम्या