एक दोन नव्हे तब्बल 38 देशांमध्ये प्रदर्शित होणार PM Narendra Modi बायोपिक

दिग्दर्शक उमंग कुमार यांच्या या सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी आयुष्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 7, 2019 05:41 PM IST

एक दोन नव्हे तब्बल 38 देशांमध्ये प्रदर्शित होणार PM Narendra Modi बायोपिक

मुंबई, ०७ एप्रिल- ‘पीएम नरेंद्र मोदी’ बायोपिक अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सोशल मीडियावरही या सिनेमाबद्दल नानाविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, निर्मात्यांनी सिनेमाची टीम बायोपिक एक दोन नव्हे तर तब्बल ३८ देशांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात यूएस, यूके, कनाडा, ऑस्ट्रेलिया आणि यूएईसारख्या देशात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक उमंग कुमार यांच्या या सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी आयुष्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या सिनेमात मोदींच्या बालपणापासून पंतप्रधान होईपर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.सिनेमाचे निर्माते आणि वितरकांपैकी एक निर्माते आनंद पंडित यांनी म्हटले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी फक्त भारतीयांनाच नाही तर जगभरातील अनेकजण उत्सुक आहेत. त्यामुळेच आम्ही फक्त भारतात नाही तर जगभरात ३८ देशांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.’

Loading...

ते पुढे म्हणाले की, ‘भारतात हा सिनेमा १७०० स्क्रिनवर दाखवण्यात येईल. तर जगभरात हा सिनेमा ६०० स्क्रिनवर दाखवण्यात येईल.’ पीएम नरेंद्र मोदी हा बायोपिक हिंदीशिवाय तेलगू आणि तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.

आनंद पंडित म्हणाले की, ‘जे सिनेमांवर प्रश्न उपस्थित करत आहेत आणि सिनेमावर बंदी आणण्याची मागणी करत आहेत, हे तेच लोक आहेत जे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला आहे.’


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2019 05:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...