'PM Narendra Modi'रिलीजचा मार्ग मोकळा? निवडणूक आयोगासाठी सिनेमाचं स्क्रिनिंग

उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोगाला पीएम नरेंद्र मोदी सिनेमा पाहून मगच प्रदर्शनाबाबत योग्य तो निर्णय घ्यायचा आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 01:15 PM IST

'PM Narendra Modi'रिलीजचा मार्ग मोकळा? निवडणूक आयोगासाठी सिनेमाचं स्क्रिनिंग

मुंबई, 17, एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या जीवनावर आधारित सिनेमा 'पीएम नरेंद्र मोदी' गेल्या काही दिवसांपासून वादात सापडला आहे. 5 एप्रिलला होणाऱ्या या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलून 11 एप्रिल करण्यात आली. पण आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिनेमाच्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे. या सिनेमावर बंदी आणण्यासाठी विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. पण, सूत्रांनी दिलेल्या  माहितीनुसार, आज बहुप्रतीक्षित 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
 

Loading...

View this post on Instagram
 

#pmnarendramodi #promotions Styled by: @vasundhara.joshi Wardrobe courtesy: @jadebluelifestyle Makeup:@nitinshitole77 hair:@rohangangdhar


A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi) on

तसंच निवडणूक आयोगासाठी आज 'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिकचं स्क्रिनिंगदेखील होण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना या सिनेमाच्या स्क्रिनिंगची तयारी करण्यास सांगितल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आजच या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरवली जाऊ शकते, असाही अंदाज वर्तवला जात आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सिनेमाच्या निर्मात्यांना या सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी निवडणूक आयोग तयार असल्याची माहिती दिली. मात्र आयोगानं या स्क्रिनिंगसाठी कोणतीही ठराविक वेळ निर्मात्यांना दिलेली नाही.
न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोगाला हा सिनेमा पाहून त्यानंतरच सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. निवडणूक आयोगानं 10 एप्रिलला या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. पण नंतर सिनेमाच्या निर्मात्यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यावर आयोगानं सिनेमा पाहा आणि मग ठरवा की सिनेमा प्रदर्शित करावा की नाही? असे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतची पुढील सुनावणी 22 एप्रिलला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 01:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...