'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिकच्या रिलीजचा मार्ग अखेर मोकळा, या दिवशी सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिकच्या रिलीजचा मार्ग अखेर मोकळा, या दिवशी सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

निवडणुका होईपर्यंत 'पी एम नरेंद्र मोदी'च्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती.

  • Share this:

मुंबई, 3 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक 'पीएम नरेंद्र मोदी' मागच्या काही दिवसांपासून त्याच्या रिलीज डेटमध्ये वारंवार होत असलेल्या बदलांमुळे खूप चर्चेत आहे. सुरुवातीला हा सिनेमा 5 एप्रिलला रिलीज होणार होता मात्र त्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी या सिनेमाच्या रिलीजवर आक्षेप घेतल्यानं या सिनेमाच्या रिलीज तारखेत अनेकदा बदल करण्यात आले. पण आता मात्र या सिनेमाच्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला असून हा सिनेमा येत्या 24 मे ला सिनेमागृहात झळकणार आहे.

'पीएम नरेंद्र मोदी' निर्माते हा सिनेमा निवडणुकांच्या काळात रिलीज करू इच्छित होते मात्र लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान हा सिनेमा रिलीज झाल्यास यामुळे मतदारांवर त्याचा प्रभाव पडेल आणि त्यामुळे याचा फायदा भाजपाला होईल असा मुद्दा मांडत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या सिनेमाच्या प्रदर्शनावर निवडणुका होईपर्यंत बंदी घालण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सोपवलं. त्यांनतर निवडणूक आयोगानं या सिनेमाच्या रिलीजवर निवणूक संपेपर्यंत बंदी घातली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक ओयोगानं हा सिनेमा पाहिला आणि त्यानंतर आपला लिफाफाबंद अहवाल उच्च न्यायालयाला सादर केला होता.

जे संजय-सलमानला जमलं नाही ते 'बादशाह'ने करून दाखवलं

निवडणूक आयोगाच्या अहवालानंतर उच्च न्यायालयानं या सिनेमाच्या बंदीचा निवडणूक आयोगाचा निर्णय बरोबर असल्याचं म्हणत निवडणूका संपेपर्यंत हा सिनेमा रिलीज करता येणार नाही असा निर्णय दिला होता. त्यानंतर या सिनेमाचा ट्रेलरही YouTubeवरून हटवण्यात आला होता. मात्र आता या सिनेमाच्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला असून लोकसभा निवडणूकांचा निकाल लागल्यानंतर म्हणजे 24 मे ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केलं आसून यात अभिनेता विवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्यक्तिरेखा साकारत आहे.

चक्क अक्षय- शिल्पाचं हे गाणं ऐकून झोपायचा टायगर, जॅकी श्रॉफनेच केला खुलासा

सेटवर बाळाला दुध पाजताना अभिनेत्रीचा फोटो व्हायरल, युजर्स म्हणाले...!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2019 10:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading