मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Raju Shrivastav Health Update: पंतप्रधान मोदींचा राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांना फोन; योग्य उपचार करण्याचं दिलं आश्वासन

Raju Shrivastav Health Update: पंतप्रधान मोदींचा राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांना फोन; योग्य उपचार करण्याचं दिलं आश्वासन

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत सगळेच चिंता व्यक्त करत असताना देशाचे पंचप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांशी फोनवरुन बातचीत केल्याची बातमी समोर आली आहे.

  • Published by:  Minal Gurav
मुंबई, 12 ऑगस्ट: कॉमेडीय राजू श्रीवास्तव यांना सोमवारी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  रुग्णालयात दाखल केल्यापासून राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत कोणताही सुधारणा नसल्याचं समोर आलं आहे. त्यांची एन्जीओग्राफी देखील करण्यात आली मात्र दोन दिवसांपासून त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिलेला नाही. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत सगळेच चिंता व्यक्त करत आहेत. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची  चौकशी करुन त्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आहे. राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही श्रीवास्तव कुटुंबियांना फोन करुन चौकशी केली. श्रेया श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्याचप्रमाणे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही शिखा श्रीवास्तव यांना फोन केला होता. त्यांनी राजू यांच्या प्रकृतीची चौकशी करत त्यांना योग्य ते उपचार देण्यासाठीची पूर्ण व्यवस्था करण्याचं आश्वासन दिलं आहे. हेही वाचा - Raju shrivastav Health Update: राजू यांच्या ब्रेनवर परिणाम; 43 तासानंतरही उपचारांना प्रतिसाद नाही भाजप नेते जेपी नड्डा यांनीही राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांना फोन करुन त्यांची विचारपूस केली.  तसेच भाजप नेते महामंत्री सुनिल बंसल देखील राजू श्रीवास्तव यांना पाहण्यासाठी एम्स रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयात त्यांनी श्रीवास्तव यांच्या पत्नीची आणि नातेवाईकांची भेट घेतली. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांचा भाचा रजत श्रीवास्तव यांनी दिली होती.  त्यांनी म्हटलं होतं की, कालपेक्षा आज राजू यांच्या प्रकृतीत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे.  दरम्यान गुरुवारी आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, असं म्हटलं गेलं आहे की,  राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यापासून ते बेशुद्ध आहेत. त्यांना कार्डियक अरेस्ट अटॅक आला होता. त्यांच्यावर सध्या ICU मध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांची स्पेशल टीम त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहे.  राजू श्रीवास्तव लवकरात लवकर शुद्धीवर यावेत यासाठी सगळेच प्रार्थना करत आहेत.
First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News

पुढील बातम्या