मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /प्लस साईज मॉडेलनं दीपिकाच्या 'बेशरम रंग' ची केली हुबेहूब कॉपी; पाहून नेटकरी म्हणाले...

प्लस साईज मॉडेलनं दीपिकाच्या 'बेशरम रंग' ची केली हुबेहूब कॉपी; पाहून नेटकरी म्हणाले...

बेशरम रंग'

बेशरम रंग'

दीपिका पदुकोणच्या 'बेशरम रंग' या गाण्यावर एका प्लस साइज मॉडेलचा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 05 जानेवारी:  दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान स्टारर पठाण हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून शाहरुख तब्बल चार वर्षांनी पडद्यावर परतत आहे. पठाण रिलीजपूर्वीच प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. या चित्रपटाच्या 'बेशरम रंग' या पहिल्या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या मोनिकिनीला राजकारण्यांपासून ते सोशल मीडिया यूजर्सनी विरोध केला. मात्र, या सगळ्यामध्ये दीपिका पदुकोणच्या 'बेशरम रंग' या गाण्यावर एका प्लस साइज मॉडेलचा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आत्तापर्यंत तुम्ही इंस्टाग्रामवर बेशरम रंगाचे अनेक रील्स पाहिले असतील, पण दीपिका पदुकोणच्या गाण्यावरील हे रील पाहिल्यानंतर यूजर्सच्या नजरा हटत नाहीत. 'बेशरम रंग' या गाण्यावरील हा रील इंटरनेट सेन्सेशन तन्वी गीता रविशंकरने पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती दीपिका पदुकोण सारखी बिकिनी लूकमध्ये दिसत आहे आणि बीचवर फिरताना तिच्या अदा दाखवत आहे. या गाण्यावर ती एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे ट्वर्कही करतेय.

हेही वाचा - Deepika Padukone B'day: शाहरुख खानने दीपिकाला दिलं खास बर्थडे सरप्राईज; तुम्ही पाहिलंत का?

केवळ दीपिका पादुकोणच  नव्हे तर, अंगात जर कला आणि मनात उत्साह असला तर, आम्ही महिला देखील कुठल्याही गोष्टीत मागे नाही, असे एका महिलेने बिकनी घालुन बीचवर केलेल्या डान्स मधुन दाखवुन दिले आहे. आणि तिचा ही व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडिओ शेअर करताना तन्वीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लिहिलय की, 'तुम्ही तुमची आवडती गोष्ट करत असाल तर बेशरम व्हा. तुम्हाला जे आवडते ते करा, तुम्हाला हवं ते परिधान करा,  तुम्हाला आवडेल तसं जगा. जर या गोष्टींमुळे तुम्हाला कोणाच्या नजरेत बेशरम बनवलं जात असेल तर त्यात काहीच हरकत नाही.'

तन्वीचा हा डान्स व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर यूजर्स तिच्या आत्मविश्वासाचे कौतुक करताना थकत नाहीयेत. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'हा डान्स सिनेमात असायला हवा होता'. दुसर्‍या युजरने लिहिले, 'माझ्याजवळ सुद्धा तुझ्यासारखा आत्मविश्वास आणि आत्म-प्रेम असायला हवं.' दुसर्‍या यूजरने लिहिले की, 'ही दीपिका पदुकोणची हॉट बॉडी नाही, तरी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मी बघतच राहिलो. तू खूप हॉट दिसत आहेस.' 'तू आलीस, तू पाहिलस आणि जिंकलस'अशा कमेंट करत नेटकरी तिचं कौतुक करत आहेत.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा पठाण हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात दोघांव्यतिरिक्त जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood actress, Deepika padukone, Entertainment