Home /News /entertainment /

देवकी लवकर ये सिरीयलमध्ये! प्रेक्षकांना येतेय अभिनेत्रीची आठवण, सोशल मीडियावर व्यक्त केली इच्छा

देवकी लवकर ये सिरीयलमध्ये! प्रेक्षकांना येतेय अभिनेत्रीची आठवण, सोशल मीडियावर व्यक्त केली इच्छा

सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Asta ) मालिकेतील सर्वांची लाडकी देवकी. मीनाक्षी नुकतीच आई झाल्यानं तिनं मालिकेतून ब्रेक घेतलाय. मात्र प्रेक्षक आजही जुनी देवकी म्हणजे अभिनेत्री मीनाक्षी राठोडला मिस करत आहेत.

   मुंबई, 05 जुलै: प्रत्येक टेलिव्हिजनवर अनेक मालिका सुरू आहेत. प्रत्येक मालिकेत वेगवेगळे कलाकार. प्रत्येकाची शैली वेगळी. प्रत्येकाची फॅन फॉलोविंग वेगळी. अशामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे कलाकार फार कमीच आहेत. आपल्या व्यक्तिरेखेला पुरेपूर न्याय देऊन ती व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर बिंबवणारे कलाकारही फारचं कमी आहेत. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod)   म्हणजेच सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Asta ) मालिकेतील सर्वांची लाडकी देवकी. मीनाक्षी नुकतीच आई झाल्यानं तिनं मालिकेतून ब्रेक घेतलाय. मीनाक्षीच्या जागी अभिनेत्री भक्ती रत्नपारखी ( Bhakti Ratnaparkhi) सध्या मालिकेत देवकीच्या भूमिकेत दिसतेय. भक्तीनं देखील उत्तम देवकी साकारली आहे. मात्र प्रेक्षक आजही जुनी देवकी म्हणजे अभिनेत्री मीनाक्षी राठोडला मिस करत आहेत. अभिनेत्री मीनाक्षी राठोडनं एका सुंदर मुलीला जन्म दिलाय. सध्या ती मुलीचा सांभाळ करण्यात व्यस्त आहे. असं असलं तरी मीनाक्षी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. मीनाक्षीचं सी सेक्शन डिलिव्हरी झाल्यानं सध्या ती फक्त बाळावर आणि स्वत:वर लक्ष देत आहे. मीनाक्षीनं नुकतेच पोस्ट प्रेग्नंसीचे फोटो शेअर केलत. 'प्रीपरेशन' असं कॅप्शन देत मीनाक्षीनं तिचे साडीतील सुंदर फोटो शेअर केलेत. मुलीच्या जन्मानंतर आलेलं आईपणाचं सुख मिनाक्षीच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. मीनाक्षीला अनेकांनी शुभेच्छा दिल्यात. तर काहींनी आपण तिला देवकीच्या भूमिकेत मिस करत असल्याचं म्हटलं आहे. हेही वाचा - PHOTO: हळद लागली! आता 'या' दिवशी अभिनेत्री अमृता पवारच्या डोक्यावर पडणार लग्नाच्या अक्षता
  मीनाक्षीच्या फोटोवर कमेंट्स करत चाहत्यांनी तिला सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत पुन्हा या अशी विनंती केलीय. एका युझरनं म्हटलंय,  'तुम्ही सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका पुन्हा जॉईन करा. तुमची अँक्टिंग भारी होती, मज्जा यायची'. तर दुसऱ्या युझरनं म्हटलंय, 'लवकर या सिरीयलमध्ये, तुम्ही नाही तर मज्जा येत नाही'. मीनाक्षीच्या फोटोंवर अनेकांनी तिला 'कसलं प्रीपरेशन करताय?', असंही विचारलं आहे. 'मुलीचं नाव काय ठेवलं?', असंही अनेकांनी विचारलं आहे. तर 'खूप छान दिसत आहेस', असं म्हणत मीनाक्षीचं कौतुकही केलं आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या