Home /News /entertainment /

जंगल जंगल बात चली हैं...छोट्या नेहाचा गोड आवाज ऐकून तुम्हीही म्हणाल, सो क्यूट !

जंगल जंगल बात चली हैं...छोट्या नेहाचा गोड आवाज ऐकून तुम्हीही म्हणाल, सो क्यूट !

नेहा कक्कर (Neha Kakkar) आज जरी बॉलिवूडची टॉपची गायिका असली तरी तिचा सुरुवातीच्या काळातला प्रवास सोपा नव्हता. छोट्या मोठ्या कार्यक्रमांमधून गाणी सादर करत नेहा आज बॉलिवूडमध्ये स्थिरावली आहे. तिच्या लहानपणीचा एका कार्यक्रमातला व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 12 ऑक्टोबर: गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar)चं नाव बॉलिवूडची टॉपची गायिका म्हणून घेतलं जात आहे. पण या स्थानावर पोहोचण्यासाठी नेहाला खूप मेहनत करावी लागली आहे. लहानपणापासूनच नेहाने आपल्या गोड गळ्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. छोट्या नेहाचा गाण्याचा व्हिडीओ व्हायरल नेहा कक्कर मुळची ऋषिकेशची रहिवासी आहे. लहानपणापासूनच नेहा विविध कार्यक्रमांमध्ये गाणी सादर करत असे. नेहा कक्करचा असाच एक लहानपणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नेहा "जंगल जंगल बात चली हैं पता चला हैं" हे गाणं गात आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून नेहाने गाणं गायला सुरुवात केली आहे. 'इंडियन आयडॉल' या रिअ‍ॅलिटी शोमध्ये नेहा कक्करने पहिल्यांदा सहभाग घेतला. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. नेहाने आत्तापर्यंत अनेक गाणी गायली आहेत. प्ले बॅक सिंगिंगसाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
  एरवी प्ले बॅक सिंगर (Play Back Singer) म्हणून सतत चर्चेत राहणारी नेहा सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. पंजाबी गायक रोहनप्रीत सिंह  (Rohanpreet Singh) सोबत नेहा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. रोहनप्रीतसोबत एक व्हिडीओ शेअर करत आपल्या रिलेशनशिपची माहिती दिली. नेहा आणि रोहनप्रीत यांचं लग्न दिल्लीत होण्याची शक्यता आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Bollywood, Singer neha kakkar

  पुढील बातम्या