कॅन्सरमुळे बॉलिवूडला आणखी एक धक्का, 42 वर्षीय अभिनेत्याचं निधन

कॅन्सरमुळे बॉलिवूडला आणखी एक धक्का, 42 वर्षीय अभिनेत्याचं निधन

मागच्या वर्षभरापासून या अभिनेत्यावर अमेरिकेत ब्रेन कॅन्सरवर उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यानच त्याचं निधन झालं.

  • Share this:

मुंबई, 13 मे : मागच्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधून एकामागोमाग एक निधन वार्ता येतच आहेत. एप्रिल महिन्याच्या अखेरीस कॅन्सरमुळे सिने इंडस्ट्री इरफान खान आणि ऋषी कपूर असे दोन महान कलाकार गमावले असताना आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याचं वयाच्या 42 व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झालं आहे. अभिनेता साई गुंडेवार याचं रविवारी 10 मे ला अमेरिकेत निधन झालं. मागच्या बऱ्याच काळापासून साई कॅन्सरवर उपचार घेत होता.

सूत्रांच्या माहितीनुसार साई गुंडेवार मागच्या बऱ्याच काळापासून ब्रेन कॅन्सरशी झुंज देत होता. मागच्या वर्षभरापासून त्याच्यावर अमेरिकेत ब्रेन कॅन्सरवर उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यानच त्याचं निधन झालं. साईच्या पश्चात पत्नी आणि आई-वडील असा परिवार आहे. त्यानं आमिर खानच्या पीके सिनेमात काम केलं होतं. याशिवाय अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये त्याच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार साईनं मागच्या 7 महिन्यांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली नाही. मागच्या वर्षी 25 ऑक्टोबरला त्यानं एक फोटो पोस्ट केला होता. ज्यात त्याला ओळखणंही कठीण झालं होतं. त्याच्या निधनाची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरून दिली होती. साईच्या निधनामुळे बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला.

First published: May 13, 2020, 4:34 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या