Pulwama Terror Attack- सरणावरची आग अजूनही विझली नाही, मुले पौरकी शाहीदांची हो निजली नाही- जितेंद्र जोशी

Pulwama Terror Attack- सरणावरची आग अजूनही विझली नाही, मुले पौरकी शाहीदांची हो निजली नाही- जितेंद्र जोशी

ही पहिली वेळ नाही की जितेंद्रने कवितेच्या माध्यमातून त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या. त्याची ही कविता वाचून शहिदांच्या घरातील दुःखाची जाणीव अधिक तीव्र होते.

  • Share this:

मुंबई, १५ फेब्रुवारी २०१९- जैश- ए- महम्मदच्या अतिरेख्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्यात केलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४४ जवान शहीद झाले. गेल्या दोन दशकातील हा दुसरा मोठा हल्ला आहे. या हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली असून अजून आपण किती शांत बसणार असा सवाल प्रत्येकजण करत आहेत. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या मनातील चीड व्यक्त केली. मराठी अभिनेता जितेंद्र जोशीनेही त्याच्या मनातील राग कवितेच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडला. जितेंद्रची ही कविता वाचून अजून आपण शांत का? हे किती दिवस चालणार? आपण उत्तर देणार का? की आपण मागचाच कित्ता गिरवत राहणार असे एक ना अनेक प्रश्न मनात येतात.


जितेंद्र जोशीची कविता-

सरणावरची आग अजूनही विझली नाही

मुले पौरकी शाहीदांची हो निजली नाही

निलाजर्या लोकांचे जगणे अप्पलपोटी

मने कोरडी रक्तानेही भिजली नाही

आग लागली अवतीभवती

मनात पण ठीणगीहि नाही

अब्रू स्वाभिमान चिरडला

कितीक किड्यांसम फुटले

ती गणतीही नाही

सहिष्णुतेचा बुरखा घेऊन जगतो आम्ही

मरण ओढतो अजूनही आमची जिरली नाही

धर्म जाहला शाप

पसरले पाप

उरी अंधार दाटला

गिळून घेईल साप

लागुनी धाप

कोवळा जीव फाटला

अणु रेणूंचा स्फोट होऊनी

जळतो आम्ही

देवा(?) आता मनात आशा उरली नाही

निलाजर्या लोकांचे जगणे अप्पलपोटी

मने कोरडी रकतानेही भिजली नाही -जितेंद्र जोशी

View this post on Instagram

सरणावरची आग अजूनही विझली नाही मुले पौरकी शाहीदांची हो निजली नाही निलाजर्या लोकांचे जगणे अप्पलपोटी मने कोरडी रक्तानेही भिजली नाही आग लागली अवतीभवती मनात पण ठीणगीहि नाही अब्रू स्वाभिमान चिरडला कितीक किड्यांसम फुटले ती गणतीही नाही सहिष्णुतेचा बुरखा घेऊन जगतो आम्ही मरण ओढतो अजूनही आमची जिरली नाही धर्म जाहला शाप पसरले पाप उरी अंधार दाटला गिळून घेईल साप लागुनी धाप कोवळा जीव फाटला अणु रेणूंचा स्फोट होऊनी जळतो आम्ही देवा(?) आता मनात आशा उरली नाही निलाजर्या लोकांचे जगणे अप्पलपोटी मने कोरडी रकतानेही भिजली नाही -जितेंद्र जोशी #पुलवामा #PulawamaTerrorAttack

A post shared by jitendra shakuntala joshi (@jitendrajoshi27) on


ही पहिली वेळ नाही की जितेंद्रने कवितेच्या माध्यमातून त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या. याआधीही जितेंद्रने त्याच्या परखड कवितांमधून समाजातील सद्यस्थितीवर आणि घडामोडींवर निर्भीडपणे भाष्य केलं आहे. त्याची ही कविता वाचून शहिदांच्या घरातील दुःखाची जाणीव अधिक तीव्र होते. फक्त जितेंद्रच नाही तर इतर अनेक मराठी आणि बॉलिवूड कलाकारांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे.

VIDEO : पुलवामातील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात राज ठाकरे म्हणतात..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2019 11:08 AM IST

ताज्या बातम्या