Home /News /entertainment /

'फुलपाखरू' फेम मानस चा क्लीन शेव्ह LOOK; पहिल्यांदाच अशा रूपात दिसला अभिनेता

'फुलपाखरू' फेम मानस चा क्लीन शेव्ह LOOK; पहिल्यांदाच अशा रूपात दिसला अभिनेता

अभिनेता यशोमन आपटेनं नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले खास फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये यशोमन आपल्या घरात विराजमान झालेल्या बाप्पासोबत दिसून येत आहे.

  मुंबई, 11 सप्टेंबर- कलाकार आणि चाहत्यांचं नातं खूपच वेगळं असतं. कलाकारांच्या प्रत्येक गोष्टींवर चाहत्यांचं लक्ष असत. त्यामुळे आपल्या आवडत्या कलाकारांनी थोडासाही लुक चेंज केला. तर चाहते तो पटकन हेरतात. असच काहीसं झालं अभिनेता यशोमन आपटेसोबत. 'फुलपाखरू'(Phulpakharu) या मालिकेतून यशोमन आपटे(Yashoman Apte) घराघरात पोहोचला होता. या मालिकेतून  मानस म्हणून तो लोकप्रिय झाला आहे. या मालिकेनंतरही चाहते त्याला मानस या नावानेच ओळखतात.
  अभिनेता यशोमन आपटेनं नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले खास फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये यशोमन आपल्या घरात विराजमान झालेल्या बाप्पासोबत दिसून येत आहे. मात्र फोटोमध्ये एका गोष्टीने चाहत्यांचं खास लक्ष वेधून घेतलं आहे. ती गोष्ट म्हणजे यशोमनचा न्यू लूक.  या फोटोंमध्ये यशोमन एकदम नव्या लूकमध्ये दिसून येत आहे. (हे वाचा:परश्याचा Messy हेअर LOOK; आकाशने ब्लॅक अँड व्हाईट फोटो केले शेअर) यशोमनने आपल्या बाप्पासोबत शेयर केलेल्या फोटोंमध्ये क्लीन शेव्हमध्ये दिसून येत आहे. यशोमन पहिल्यांदाच असा क्लीन शेव्हमध्ये दिसून येत आहे. मालिकांमध्य दिसणारा यशोमन आणि या फोटोतील यशोमन खूपच वेगळा दिसत आहे. त्यामुळे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. अनेकांनी या फोटोवर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने कमेंट करत 'वोह्ह न्यू लूक' असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या युजरने 'किती गोड यशोमन' असं म्हटलं आहे. तर आणखी एकीने 'क्लीन शेव्हमध्ये खूपच मस्त दिसतोस' असं म्हटलं आहे. (हे वाचा:गौरी आल्या घरा...' पाहा अभिनेत्री अंकिता लोखंडेचं खास गौरी पूजन) यशोमन आपटे 'फुलपाखरू' या मालिकेमध्ये सर्वप्रथम प्रसिद्धीस आला होता. हि मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. कॉलेज तरुण-तरुणींमध्ये या मालिकेची मोठी क्रेझ होती. मालिकेत यशोमनसोबत अभिनेत्री हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत होती. ही मालिका बंद होऊनसुद्धा चाहत्यांमध्ये अजूनही मालिकेची चर्चा असते. मालिकेतील मांस आणि वैदेहीची जोडी खूपच पसन्त पडली होती. यानंतर यशोमन 'श्रीमंत घरची सून' या मालिकेत झळकला होता.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi entertainment

  पुढील बातम्या