सफर सलमानच्या पनवेलमधील सुंदर फार्म हाऊसची! अभिनेत्री जॅकलिनने केले PHOTO शेअर
सफर सलमानच्या पनवेलमधील सुंदर फार्म हाऊसची! अभिनेत्री जॅकलिनने केले PHOTO शेअर
लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सलमान खान सध्या पनवेलच्या आपल्या फार्म हाऊसवर आहे. याठिकाणी तो कुटुंबीय आणि मित्रमैत्रिंणींबरोबर वेळ घालवत आहे. दरम्यान त्याच्या या फार्म हाऊसचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जॅकलिनने तिच्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेले सलमान खानच्या फार्म हाऊसवरील काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की ही जागा किती सुंदर आहे.
कोरोना व्हायरसमुळे सर्व कलाकारांना घरीच बसावं लागत आहे. सलमान खान देखील त्याचे कुटुंबीय आणि मित्रमंडळीबरोबर पनवेलच्या फार्महाऊसवर वेळ घालवताना दिसत आहे.
पनवेलच्या या फार्महाऊसवरून सलमानने अनेक गरजूंना मदत देखील पाठवली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.
दरम्यान सलमान खानच्या कुटुंबीयांबरोबर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez), Waluscha De Sousa आण सलमानची अगदी जवळची मैत्रिण यूलिया वांतूर (Iulia Vantur) देखील याच फार्महाऊसवर आहेत.
जॅकलिनने काढलेल्या एका फोटोमध्ये चक्क पंजाबी ड्रेस घातलेली यूलिया पाहायला मिळत आहे.
या फार्म हाऊसच्या लिव्हिंग रुममध्ये काहीजण आराम करतानाचा फोटो देखील जॅकलिनने पोस्ट केला आहे. त्यामध्ये जुना बिग बॉस स्पर्धक निकेतन माढोक देखील पाहायला मिळत आहे.
याआधी जॅकलिनने एका मॅगझिन कव्हरसाठी देखील सलमानच्या फार्म हाऊसवर फोटोशूट केले होते संकलन, संपादन - जान्हवी भाटकर
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.