कतरिना कैफच्या मालदिव व्हेकेशनचे फोटो एकदा पाहाच

कतरिना कैफच्या मालदिव व्हेकेशनचे फोटो एकदा पाहाच

अभिनेत्री कतरिना कैफ बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल साइट्सवर ती फार सक्रीय नसली तरी तिचे फॅन फॉलोविंग दरदिवसाला वाढताना दिसतात.

  • Share this:

मुंबई, ०५ मार्च- अभिनेत्री कतरिना कैफ बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल साइट्सवर ती फार सक्रीय नसली तरी तिचे फॅन फॉलोविंग दरदिवसाला वाढताना दिसतात. कतरिनाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कोणताही नवीन फोटो अपलोड झाला की तो काही मिनिटांतच व्हायरल होतो. असंच काहीसं आताही झालं आहे. असंच काहीसं झालं जेव्हा कतरिनाने तिच्या मालदीवमधील सुट्ट्यांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.

असं म्हटलं जातं की कतरिनाने ‘भारत’ सिनेमाचं चित्रीकरण नुकतंच संपवलं आणि त्यानंतर ती मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घ्यायला गेली. या दरम्यान हेअर आर्टिस्ट डॅनिअल बाउरसोबतचे फोटो कतरिनाने इन्स्टाग्रामवर शेअर केले. डॅनिअलने कतरिनाच्या फोटोवर कमेंट करत म्हटलं की, ‘मालदीव्जमधून सर्वांना गुड नाइट.’ या फोटोमध्ये कतरिना फार साध्या लुकमध्ये दिसत आहे. मेकअपशिवायही ती तेवढीच सुंदर दिसते हे तिने पुन्हा एकदा दाखवून दिलं.

View this post on Instagram

Good night from the Maldives!

A post shared by Daniel Bauer Makeup And Hair (@danielcbauer) on

कतरिनाच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ती ‘भारत’ सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अली अब्बास जफरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून दिशा पाटनी, तब्बू, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोवर आणि नोरा फतेही अशी तगडी स्टार कास्ट या सिनेमात पाहायला मिळेल. या वर्षी ईदला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

VIDEO : चव्हाणांनी मानले राज ठाकरेंचे आभार, म्हणाले...

First published: April 5, 2019, 7:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading