विकी कौशलबरोबरच्या नात्याबाबत स्वत: कतरिनाने केला खुलासा?

विकी कौशलबरोबरच्या नात्याबाबत स्वत: कतरिनाने केला खुलासा?

कतरिना-विकी दोघेही आपल्या नात्याचा सर्वांसमोर स्वीकार करत नसले, तरी त्यांच्या चाहत्यांच्या नजरेतून काहीच सुटत नाही. कतरिनाने पोस्ट केलेल्या प्रत्येक फोटोमध्ये तिचे चाहते विकीला शोधत असतात.

  • Share this:

मुंबई, 28 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) आपल्या कथित रिलेशनशीपमुळे नेहमीच चर्चेत असतात. बऱ्याचदा दोघांना एकत्र पाहिले गेले आहे, त्यामुळे ते एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. पण दोघेही आपल्या रिलेशनशिपबद्दल काहीही बोलायला तयार नाही. दोघांच्याही चाहत्यांकडून त्यांच्या जोडीला पसंती मिळते. दोघेही आपल्या नात्याचा स्वीकार करत नसले तरी सुद्धा त्यांच्या चाहत्यांच्या नजरेतून काहीच सुटत नाही. कतरिनाने पोस्ट केलेल्या प्रत्येक फोटोमध्ये तिचे चाहते विकीला शोधत असतात.

आता देखील असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. नुकताच कतरिनाने इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये तिच्या चाहत्यांनी विकी कौशलला शोधले आहे. कतरिना कैफचा हा फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. कतरिनाने बटरफ्लाय फिल्टरमध्ये काढलेला एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. कतरिनाने पोस्ट केलेल्या फोमध्ये मस्टड यलो कलर दिसत आहे. यावरुन कतरिनाच्या चाहत्यांनी तिने विकी कौशलला मिठी मारली असल्याच्या अंदाज लावला आहे.

(वाचा - अभिनेत्रीने केलं बॉडीगार्डशीच लग्न; चौथ्यांदा बांधली लग्नगाठ)

एवढंच नाही तर युजर्सनी विकीचा मस्टड यलो कलरचा टी-शर्ट घातलेला फोटो आणि कतरिनाने नुकताच इन्स्टावर पोस्ट केलेला फोटो एकत्र करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. दोघांचाही हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून दोघांचेही चाहते त्यावर भरभरुन कमेंट्स करताना दिसत आहेत. दरम्यान, कतरिना कैफ आणि तिची बहीण इसाबेल कैफ, तर विकी कौशल आणि त्याचा भाऊ सनी कौशक या सर्वांनी एकत्र येत नवीन वर्षाचं (New Year) स्वागत केलं असल्याच्या अफवा सोशल मीडियावर चर्चेत होत्या.

(वाचा - चर्चेला काहीही निमित्त! साराच्या 'या' बिकिनीच्या किमतीवरून सोशल मीडिया पेटला)

दरम्यान, कतरिना कैफ लवकरच 'फोन भूत' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ईशांत खट्टर आणि सिद्धार्थ चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सलमान खानसोबत ती 'टायगर 3' चित्रपटात सुद्धा दिसणार आहे. याव्यतिरिक्त कतरिना कैफने रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. तर, विकी कौशल लवकरच शूजित सरकारचा आगामी चित्रपट 'सरदार उधम सिंह' मध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त तो सॅम मानेकशॉ यांच्या बायोपिकमध्ये देखील दिसणार आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: January 28, 2021, 1:46 PM IST

ताज्या बातम्या