Home /News /entertainment /

'फिर हेरा फेरी 3' चित्रपट येणार समजताच सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा पाऊस!

'फिर हेरा फेरी 3' चित्रपट येणार समजताच सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा पाऊस!

गेल्या अनेक वर्षांपासून लोक 'फिर हेरा फेरी 3' ची (Phir hera pheri 3) वाट बघत आहे. अखेर प्रेक्षकांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

  मुंबई, 24 जून : 'फिर हेरा फेरी' (Phir hera pheri)या चित्रपटाची एक वेगळीच क्रेझ असलेली पहायला मिळते. 2000 साली आलेल्या अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल स्टारर कॉमेडी चित्रपट 'हेरा फेरी' ने एक अनोखा विक्रम बनवला होता. या चित्रपटाचा प्रतिसाद पाहून निर्मात्यांनी या चित्रपटाचा सिक्वलही घोषित केला. 2006 मध्ये या चित्रटाचा सिक्वल आला. या चित्रपटांच्या क्रेझनं या सिक्वलवरही चाहत्यांनी अमाप प्रेम दिलं. भरभरून कौतुकांचा वर्षाव केला. गेल्या अनेक वर्षांपासून लोक 'फिर हेरा फेरी 3' ची (Phir hera pheri 3) वाट बघत आहे. अखेर प्रेक्षकांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल स्टारर कॉमेडी चित्रपट (Comedy movie) 'हेरा फेरी' च्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिल्यावर लवकरच 'फिर हेरा फेरी 3' ही येणार आहे. फिल्ममेकर फिरोज नाडियावाला (Firoj Nadiawala)यांनी बाॅलिवूड हंगामालाल दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये याविषयी उल्लेख केला. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्यासोबत लवकरच 'हेरा फेरी 3' बनवण्यात येणार आहे. चित्रपटाची टीम कथा आणि इतर गोष्टींवर काम करत आहे. बाकीच्या भागाचे यश आपण हलके घेऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या कथेपासून पात्रापर्यंत बारकाईने काम करावे लागेल, असं नाडियावाला यांनी म्हटलं. 'फिर हेरा फेरी 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार म्हणल्यावर चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. सोशल मीडियावर तर मीम्सचा पाऊस पहायला मिळतो. अनेक भन्नाट मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांची उत्सुकताही पहायला मिळतेय.
  हेरा फेरी चा पहिला भाग  2000 आणि दुसरा 2006 मध्ये रिलीज झाला होता. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. त्यामुळे आता तिसऱ्या भागाला प्रेक्षक किती प्रेम देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Akshay Kumar, Bollywood, Bollywood News, Comedy

  पुढील बातम्या