News18 Lokmat

VIDEO: रजनीकांत यांची जादू पुन्हा चालली, मुंबईत पोंगलआधीच साजरं केलं नवीन वर्ष

सुपरस्टार असावा तर रजनीकांत यांच्यासारखाच. रजनी यांचा सिनेमा येणार म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी तो दिवस सणापेक्षा कमी नसतो.

News18 Lokmat | Updated On: Jan 10, 2019 02:24 PM IST

VIDEO: रजनीकांत यांची जादू पुन्हा चालली, मुंबईत पोंगलआधीच साजरं केलं नवीन वर्ष

सुपरस्टार असावा तर रजनीकांत यांच्यासारखाच. रजनी यांचा सिनेमा येणार म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी तो दिवस सणापेक्षा कमी नसतो.
रजनी यांचा सिनेमा इतर कलाकारांसारखा प्रदर्शित होत नाही. जेव्हा सुपरस्टार रजनीकांत यांचा सिनेमा प्रदर्शित होणार असतो तेव्हा मोठमोठे पोस्टर लावले जातात. असंच काहीसं वातावरण आता पेट्टा सिनेमाच्या प्रदर्शनावेळी दिसतंय.

सिनेमा आज प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी सर्व चित्रपटगृह हाऊसफुल आहेत. चित्रपटगृहांच्या बाहेर आणि रस्त्यांवर जल्लोष केला जात आहे. सध्या सोशल मीडियावर या जल्लोषाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.


‘पेट्टा’ सिनेमाचं स्वागत आणि ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’चे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. नेल्लाई राम चित्रपटगृहाकडे रजनीकांत यांचं भल मोठं पोस्टर लावण्यात आलं आहे. सिनेमा पाहायला जाण्यापूर्वीच लोक पोस्टरचं दर्शन घेऊन चित्रपटगृहात जात आहेत. काही चाहते तर चालू ट्रकवरच फटाके फोडत आहेत.


रजनीकांत यांच्यासाठी दाक्षिणात्य राज्यांमध्ये किती प्रेम आहे हे काही नव्याने सांगायला नको. या फोटो आणि व्हिडिओवरुन ते स्पष्टपणे दिसत आहेच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 10, 2019 02:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...