प्रियांका चोप्राला UNICEFच्या सदिच्छा दूत पदावरून हटवण्याची पाकिस्तानची मागणी; 'हे' आहे कारण

भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान आता रडीचा डाव खेळताना दिसत आहे. सर्व आघाडींवर अयशस्वी झाल्यानंतर पाकिस्ताननं प्रियांका चोप्रा विरोधात ऑनलाईन याचिका दाखल केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 3, 2019 07:12 PM IST

प्रियांका चोप्राला UNICEFच्या सदिच्छा दूत पदावरून हटवण्याची पाकिस्तानची मागणी; 'हे' आहे कारण

इस्लामाबाद, 3 मार्च : प्रियांका चोप्राला UNICEF अर्थात United Nations International Children's Emergency Fundच्या सदिच्छा दूत पदावरून हटवण्याची मागणी पाकिस्ताननं केली आहे. त्याकरता पाकिस्ताननं ऑनलाईन याचिका देखील दाखल केली आहे. पीटीआयनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. भारतीय हवाई दलानं पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक केला. त्यामध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाले. त्यानंतर प्रियांकानं ट्विटरवरून भारतीय हवाई दलाचं अभिनंदन केलं. ही बाब पाकिस्तानला चांगलीच झोंबली. परिणामी, प्रियांकाला UNICEFच्या सदिच्छा दूत पदावरून हटवा अशी मागणी पाकिस्ताननं केली आहे.

पुलवामा हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं दहशतवाद्यांविरोधात कठोर पावलं उचलली. यावेळी एअर स्ट्राईक करत भारतानं बालाकोटमधील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. यामध्ये जैशचे टॉपचे कमांडर देखील ठार झाले. त्यामुळे देशात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. यानंतर प्रियांकांनं देखील ट्विटरवरून भारतीय हवाई दलाचं कौतुक केलं होतं.

मोठी बातमी, कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचा मृत्यू : सूत्र


भारताच्या हवाई हल्ल्यानंतर दाऊदलाही फुटला घाम, ठिकाणा बदलणार?


Loading...

भारतीय हवाई दलाची धाडसी कारवाई

बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलानं घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. यामध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाले. पाक व्याप्त काश्नीरमध्ये जवळपास 80 किमी आतमध्ये हे ठिकाण आहे. पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतानं ही कारवाई केली होती. हवाई दलाची ही मोठी आणि धाडसी कारवाई होती.

यावेळी मिराज - 2000ची ताकद पाहून पाकिस्तानच्या हवाई दलानं मागे जाणं पसंत केलं होतं. 26 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 वाजून 20 मिनिटांनी ही कारवाई करण्यात आली. जवळपास 21 मिनिटं दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले करण्यात आले. भारताची ही कारवाई पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून करण्यात आली होती. या साऱ्या घडामोडींमध्ये पाकिस्तान आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील एकटा पडला आहे.

EXCLUSIVE VIDEO: अशी झाली आहे काश्मीरच्या पर्यटनाची स्थिती


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2019 07:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...