पंतप्रधानांसह 'या' सेलिब्रिटींनी वाहिली श्रीदेवींना ट्विट करून श्रद्धांजली

त्यांना बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी तसंच राष्ट्रपती ,पंतप्रधानांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Feb 25, 2018 05:45 PM IST

पंतप्रधानांसह 'या' सेलिब्रिटींनी वाहिली श्रीदेवींना ट्विट करून श्रद्धांजली

25 फेब्रुवारी: श्रीदेवींच्या अकाली निधनामुळे अख्खा देश हळहळला तर बॉलिवूडवर शोककळा पसरली. त्यांना बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी तसंच राष्ट्रपती ,पंतप्रधानांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली.

'या' सेलिब्रिटीजनी वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीदेवींना ट्विटरवरून आदरांजली वाहिली सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवींच्या अकाली निधनानं अतीव दुःख झालं. चित्रपटसृष्टीतल्या त्या दिग्गज अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका केल्या, त्यांची अनेक पात्र अजरामर झाली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

आमिर खान

- श्रीदेवींच्या अकाली आणि अचानक जाण्यानं मला खूप मोठा धक्का बसला. मी नेहमीच त्यांच्या कामाचा खूप मोठा फॅन होतो. कुटुंबातल्या सर्वांचं मी सांत्वन करतो. त्यांच्या लाखो चाहत्यांप्रमाणंच मीही त्यांच्या निधनाच्या दुःखात सामिल आहे. मॅडम, तुम्ही सदैव आमच्या स्मरणात राहाल.

अक्षय कुमार

श्रीदेवींच्या दुःखद आणि अकाली निधनानं मला अतीव दुःख झालं. त्या अनेकांचं स्वप्न होत्या. त्यांच्यासोबत काम करायचं भाग्य मला अनेक वर्षांपूर्वी मिळालं. त्यांच्या कुटुंबीयांसाठी मी प्रार्थना करतो.

काजोल

मला धक्का बसलाय. खळखळून हसणाऱ्या श्रीदेवी अजूनही डोळ्यासमोर येतायेत. विश्वासच बसत नाहीये. अतिशय उत्कृष्ठ अभिनेत्री, अभिनयाचं विद्यापीठच जणू. त्यांच्याकडून मी खूप शिकले. खूप मोठं नुकसान झालंय.

माधुरी दीक्षित

सकाळी उठल्यावर मला ही भयानक बातमी कळली. त्यांच्या कुटुंबीयांचा विचार करून खूप वाईट वाटतंय. अतिशय प्रतिभावान व्यक्तीला जग मुकलंय. खूप मोठी परंपरा त्या मागे ठेवून गेल्या आहेत.

रजनीकांत

मला खूप मोठा धक्का बसलाय, मी डिस्टर्ब झालोय. मी एका प्रिय मैत्रिणीला गमावलंय आणि चित्रपटसृष्टीनं एका दिग्गज अभिनेत्रीला गमावलंय. त्यांच्या कुटुंबीयांचं दुःख मी समजू शकतो.. तुझ्या आत्म्यास शांती मिळो, तुझी खूप आठवण येईल...

कमल हसन

श्रीदेवींचं आयुष्य मी अगदी पहिल्यापासून पाहिलंय. एक साधी तरुणी ते दिग्गज अभिनेत्री हा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. त्यांच्यासोबत अनेक चांगले क्षण व्यतीत केले, ते सगळे मला आता आठवतायेत. सदमामधलं ते अंगाईगीत मला अजूनही आठवतं.. त्यांची खूप आठवण येईल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 25, 2018 05:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close