'बिग बीं'ना 'या' देशाचे नागरिक म्हणतात 'येऊ नका'

'बिग बीं'ना 'या' देशाचे नागरिक म्हणतात 'येऊ नका'

एक देश असाही आहे ज्या देशाचे नागरिक अमिताभ बच्चनला आमच्या देशात येऊ नका असं म्हणत आहेत.

  • Share this:

29 ऑगस्ट: अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे शहेनशहा आहेत. ते जिथे जातात तिथे त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. पण एक देश असाही आहे ज्या देशाचे नागरिक अमिताभ बच्चनला आमच्या देशात येऊ नका असं म्हणत आहेत.

हा देश आहे मालदिव.  तर झालंय असं की ड्ब्ल्यूएचओची एक कॉन्फरन्स मालदिवमध्ये आयोजित करण्यात आली आहे. डब्ल्यूएचओचे बिग बी गुडविल ब्रॅँड अॅम्बासेडर आहेत. त्यामुळे त्यांना या कॉन्फरन्सला बोलवण्यात आलंय. पण सध्या मालदिवमध्ये राजकीय अस्थिरता आहे. अनेक पत्रकारांची हत्या होते आहे. अनेक नेते कैदेत आहेत. त्यामुळे या अस्थिरतेचा निषेध करण्यासाठी अमिताभ बच्चननी येऊ नये असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. अनेकांनी तसं ट्विटही केलंय.

आता अमिताभ बच्चन मालदिवला जातात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

First published: August 29, 2017, 2:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading