Home /News /entertainment /

Theatre Release: चित्रपटगृहातच रिलीज होणार RRR,अटॅक आणि गंगूबाई काठियावाडी

Theatre Release: चित्रपटगृहातच रिलीज होणार RRR,अटॅक आणि गंगूबाई काठियावाडी

RRR हा चित्रपट 13 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे.

    मुंबई, 8 सप्टेंबर- कोरोना परिस्थितीमुळे(Corona Pandemic) देशभरातील चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. सध्या कोरोना आटोक्यात येत असल्यामुळे कोरोनाच्या नियमांचं पालन करत देशातील अनेक राज्यात चित्रपटगृह चालू करण्यात आली आहेत. मात्र महाराष्ट्रसारख्या मोठ्या राज्यात चित्रपटगृह(Theatre) अजूनही बंदचं आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात चित्रपट प्रदर्शनाबद्दल अजूनही शंका आहे. अनेक मोठमोठे चित्रपट(Film Release) प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. मात्र कोरोनामुळे त्यांची तारीख पुढ ढकलण्यात येत आहे. यामध्ये ‘83’ ते सूर्यवंशी’सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. या सर्व परिस्थितीमुळे प्रेक्षकांच्या मनात अशी अफवा आहे, की आलिया भट्टची ‘गंगुबाई काठियावाडी, रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांचा RRR तसेच जॉन अब्राहिमचा ‘अटॅक’ हे चित्रपट चित्रपटगृह नव्हे तर डिजिटल माध्यमावर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. मात्र पेन स्टुडीओजचे चेअरमन जयंतीलाल गडा यांनी या अफवांचं खंडन केलं आहे. तसेच हे चित्रपट चित्रपटगृहातचं प्रदर्शित होणार असल्याची पुष्ठी केली आहे. तसेच पेन स्टुडीओजनेसुद्धा याबद्दलचं स्टेटमेंट जाहीर केलं आहे. (हे वाचा:शशी थरूर यांची खिल्ली उडवणारे जावेद अख्तर झाले ट्रोल; पत्नी शबानाने म्हटलं JUST ) पेन स्टुडीओजने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे, ‘आम्ही स्पष्ट करू इच्छितो, ‘गंगुबाई काठियावाडी, RRR तसेच ‘अटॅक’ हे चित्रपट चित्रपटगृहातचं प्रदर्शित केले जातील. तत्पूर्वी चित्रपटगृहात येण्याआधी हे चित्रपट OTTवर रिलीज केले जातील असं सांगण्यात येत आहे. मात्र ही एक निव्वळ अफवा आहे. कारण हे चित्रपट खूपच भव्यदिव्य आहेत. आणि ते फक्त मोठ्या पडद्यासाठीचं बनले आहेत’. (हे वाचा: पवनदीप-अरुणिता KBC मध्ये लावणार हजेरी; VIDEO होतोय VIRAL) ‘गंगुबाई काठियावाडीचा ट्रेलर आधीच प्रदर्शित झाला आहे. मात्र त्याच्या प्रदर्शनाची तारीख अजूनही समोर आलेली नाहीय, RRR हा चित्रपट 13 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. तसेच जॉन अब्राहिमचा ‘अटॅक’चीसुद्धा रिलीज डेट समोर आलेली नाहीय.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood News

    पुढील बातम्या