उन्नाव बलात्कार पीडितेच्या अपघातात अभिनेत्रीने केलं भाजप आमदाराचं समर्थन, म्हणाली...

उन्नाव बलात्कार पीडितेच्या अपघातात अभिनेत्रीने केलं भाजप आमदाराचं समर्थन, म्हणाली...

या बलात्काराची कथा ही जणी काही एखाद्या बॉलिवूड सिनेमातून घेतल्याप्रमाणेच वाटते. सोशल मीडियाच्या युगात उघडपणे दादागिरी कोणी करू शकत नाही.

  • Share this:

मुंबई, 30 जुलै- उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात झालेल्या सामुहिक बलात्कार पीडितेचा नुकताच अपघात झाला. या प्रकरणी आरोपी आणि भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावर यासंबंधीत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याचप्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगीने एक व्हिडिओ शेअर करत वादाची ठिंणगी पेटवली आहे. या व्हिडिओत तिने असं काही म्हटलं की, ट्विटरवर तिला ट्रोल केलं जात आहे. तिने अनेक तर्क वितर्क लढवत आमदार कुलदीप सिंह सेंगर यांचं समर्थन केलं आहे.

पायल रोहतगी म्हणाली की, 'या बलात्काराची कथा ही जणी काही एखाद्या बॉलिवूड सिनेमातून घेतल्याप्रमाणेच वाटते. सोशल मीडियाच्या युगात उघडपणे दादागिरी कोणी करू शकत नाही. कारण तो आधीच तुरुंगात होता. असं करून तो स्वतः भोवतीच फास आवळत आहे. आमदार मुर्ख थोडीच आहे जो स्वतःवर संकट ओढवून घेईल.' तिने या व्हिडिओमध्ये स्पष्ट म्हटलं की, तिला हे भाजपच्या लोकांविरुद्धचं कटकारस्थान वाटत आहे. याशिवाय तिने अनेक गोष्टींचा या व्हिडिओमध्ये उल्लेख केला.

या व्हिडिओत तिने साक्षी मिश्राच्या प्रकरणाचाही उल्लेख केला. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण वाढवून दाखवल्याचं तिने म्हटलं. पायलच्या मते, हे प्रकरण आमदाराच्या मुलीशी निगडीत असल्यामुळे हे प्रकरण मोठ्या प्रमाणावर दाखवण्यात आलं. भाजप आमदारावर चुकीचे आरोप लावण्यात येत होते की, जातीवादामुळे ते मुलीचं लग्न दुसऱ्या जातीतील मुलाशी लावून देत नाहीत. या दोन्ही प्रकरणांचा उल्लेख करत पायल म्हणाली की, हे फक्त भाजपच्या लोकांना फ्रेम करण्यासाठी जाणीवपूर्वक पद्धतीने केले जात आहे.

या व्हिडिओत पायलने वृत्त वाहिन्यांना 'भारतीय माध्यमांचे काका आणि काकू' असं म्हटलं आहे. पायलच्या या व्हिडिओवर युझर फार वाईट कमेंट देत आहेत. कोणत्याही वादात स्वतःहून अडकण्याची पायलची ही काही पहिली वेळ नाही. तिच्या ट्विटर अकाउंटवर आणि यूट्यूब चॅनलवर जनर टाकली तर ती नेहमीच वादग्रस्त विधान देताना दिसते. तिच्या काही व्हिडिओंना युझर्सचा पाठिंबा मिळतो तर काहींचा कडाडून विरोध केला जातो.

प्रियकराच्या निधनातून सावरतेय संजय दत्तची मुलगी, म्हणाली...

Sacred Games 2 च्या टीझरमध्ये गणेश गायतोंडेने विचारला 'हा' अफलातून प्रश्न

पाकिस्तानी एजंटला विकली भारतीय महिला, सनी देओलने असं आणलं घरी

SPECIAL REPORT : मॅन Vs वाईल्डमध्ये मोदी झळकणार, डिस्कव्हरीने कधी केलं शूटिंग?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2019 08:03 PM IST

ताज्या बातम्या