Home /News /entertainment /

पायल रोहतगीचे Twitter हँडल अचानक सस्पेंड! VIDEO जारी करून व्यक्त केला संताप

पायल रोहतगीचे Twitter हँडल अचानक सस्पेंड! VIDEO जारी करून व्यक्त केला संताप

सोशल मीडियावर विविध वादग्रस्त विधाने करून नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohtagi)चे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे

  मुंबई, 08 जुलै : सोशल मीडियावर विविध वादग्रस्त विधाने करून नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohtagi)चे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. अचानक अकाउंट सस्पेंड झाल्याने अभिनेत्रीला धक्का बसला आहे. पायल तिच्या फेसबुक अकाउंटवरून वेळोवेळी परखड मतं मांडत असते, त्यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगची देखील शिकार व्हावे लागले आहे. पायलचे ट्विटर अकाउंट सस्पेंड (Payal Rohatgi Twitter Account Suspended) करण्यात आले आहे. पायलने दिलेल्या माहितीनुसार तिचे अकाउंट सस्पेंड करण्याबाबत तिला कोणतीह आगाऊ सूचना मिळाली नव्हती. तिने या प्रकारानंतर नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर त्याने यासंदर्भात एक व्हिडीओ जारी केला आहे. हा व्हिडीओ जारी करून सवाल केला आहे की नक्की कोणत्या कारणासाठी माझे अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. (हे वाचा-मनोरंजन विश्व हादरलं, सुशांतनंतर आणखी एका टीव्ही अभिनेत्यानं केली आत्महत्या) तिने या व्हिडीओमध्ये असे म्हटले आहे की, 'मी कधी कोणाला शिव्या देत नाही किंवा कोणासाठीही अपशब्द वापरत नाही. तरी माझ्याबरोबर हे असे का झाले?'
  View this post on Instagram

  Why my Twitter Account is SUSPENDED ?????

  A post shared by Team Payal Rohatgi (@payalrohatgi) on

  तिने ट्विटर अकाउंट सस्पेंड झाल्याचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. तिने तिच्या चाहत्यांना असे आवाहन केले आहे की, त्यांनी यासंदर्भात आवाज उठवावा.
  View this post on Instagram

  Just Now I am not able to tweet on my verified twitter handle It is SUSPENDED citing what reasons now #payalrohatgi

  A post shared by Team Payal Rohatgi (@payalrohatgi) on

  हे पहिल्यांदा नाही की पायलचे ट्विटर अकाउंट सस्पेंड झाले आहे. जूनमध्ये देखील पायलचे ट्विटर अकाउंट सस्पेंड झाले होते. पायलने दिल्ली हिंसा प्रकरणात अटक झालेल्या जामिया मिलिया इस्मलियाच्या एमफिलची विद्यार्थिनी सफूरा जरगरबाबत टिप्पणी केली होती. त्यानंतर ट्विटरवर याबाबत चर्चा रंगली होती, आठवडाभरातच तिचे अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. यावेळी #BringBackPayal असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाला होता.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Twitter

  पुढील बातम्या