अनुराग कश्यपवर आरोप करणारी पायल घोष पुन्हा अडचणीत येणार? ऋचा चड्ढाबाबत केलं ट्वीट
दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (anurag kashyap) आरोप करताना अभिनेत्री पायल घोषने (payal ghosh) अभिनेत्री ऋचा चड्ढाबाबत (richa chadha) केलेल्या वक्तव्यावरून आधी माफी मागायची तयारी दर्शवली मात्र आता तिनं ऋचाबाबत काय म्हणाली आहे पाहा.
मुंबई, 08 ऑक्टोबर : दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) लैंगिक अत्याचाराचा आरोप करणारी अभिनेत्री पायल घोषविरोधात (Payal Ghosh) अभिनेत्री ऋचा चड्ढाने (Richa Chadha) मानहानीचा दावा ठोकला आणि पायल स्वतःच अडचणीत सापडली. मुंबई हायकोर्टात पायलच्या वकिलांनी पायल ऋचाची माफी मागायला आणि आपलं वक्तव्य मागे घ्यायला तयार असल्याचं म्हटलं. मात्र 24 तासांतच पायल पलटली. मी कुणाची माफी मागणार नाही, असं तिनं म्हटलं आहे.
अभिनेत्री पायल घोषने ऋचा चड्ढाने कोर्टात केलेल्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर नवं ट्वीट केलं. ज्यामध्ये तिनं म्हटलं आहे मी कुणाचीही माफी मागणार नाही. मी काहीच चुकीचं केलं नाही आहे आणि कुणाविरोधातही वक्तव्य केलं नाही. मला अनुराग कश्यपनं जे सांगितलं तेच मी सांगितलं.
"मी ऋचा चड्ढाविरोधात नाही. महिला म्हणून आपल्याला एकमेकांसोबत उभं राहायला हवं. खांद्याला खांदा लावून एकत्र चालायला हवं. अप्रत्यक्षरित्या तिचा किंवा माझा छळ होऊ नये, असं मला वाटतं. माझी लढाई न्यायासाठी आहे, अनुराग कश्यपविरोधात आहे आणि आता फक्त मला त्यावर लक्ष केंद्रीत करायचं आहे. चला जगाला त्याचं खरं रूप दाखवून देऊया", असं ट्वीट तिनं केलं आहे.
I hv nothing to do wd Ms Chadda.We as women hv got 2stand wd each other,shoulder to shoulder.I don't want any unintentional harrasment to her or me on this matter. My fight 4justice is against only Mr. Kashyap &I want 2focus solely on dt ryt now.Lets make d world c his true face.
अनुरागने 2014 मध्ये मला घरी बोलवून माझा विनयभंग केला आणि अश्लील वर्तन केलं, असं पायलने आपल्या आरोपामध्ये म्हटलं आहे. त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये पायलने या घटनेबाबत बोलताना ऋचा चड्ढाच्या नावाचाही उल्लेख केला होता. त्यानंतर ऋचाने पायलविरोधात हायकोर्टात धाव घेतली आणि पायलविरोघात एक कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला.
अभिनेत्री पायल घोषने सांगितलं, अनुराग कश्यपने तिला आपल्या घरी बोलावलं होतं, तेव्हा नशेत तिच्यासह जबरदस्ती केली. जेव्हा आपण याला विरोध केला तेव्हा अनुरागने माही गिल, ऋचा चड्ढा आणि हुमा कुरैशी यासारख्या अनेक अभिनेत्रींची नावं आपल्यासमोर घेतली. असं पायल एका मुलाखतीत म्हणाली. पायलने या प्रकरणात ऋचा चड्ढाचं नाव आणताच ऋचा चड्ढाने तिच्याविरोधात मानहानीचा दावा केला. मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली.
"मी एक महिला आहे. आणि प्रत्येक महिलेला योग्य तो आदर मिळायला हवा. या मताची मी आहे. पण एखाद्या महिलेने दुसऱ्या महिलेवर बिनबुडाचे आरोप करताना विचार करायला हवा" असं ऋचा चड्ढाने आपल्या कायदेशीर नोटिसीत म्हटलं.
ऋचाच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी पायल घोषचे वकील म्हणाले, "ऋचा चड्ढाबाबत केलेल्या विधानावरून पायल घोष माफी मागायला आणि आपलं वक्तव्य मागे घ्यायला तयार आहे" मात्र 24 तासांच्या आतच पायल घोष पलटली. तिनं माफी मागायला नकार दिला आहे. आपल्या भूमिकेवर ती ठाम राहिली आहे.
22 सप्टेंबरला पायलने अनुरागविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. तिने गंभीर आरोप करत अनुरागविरोधात भादवी कलम 376, 354, 341, 342 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. यानंतर 1 ऑक्टोबरला अनुरागला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. अनुरागने आपला जबाब नोंदवला आहे. त्यावेळी अनुरागचे वकीलही उपस्थित होते.