अनुराग कश्यपवर आरोप करणाऱ्या पायल घोषचा 'त्या' वक्तव्यावरून यूटर्न; आता मागणार माफी

अनुराग कश्यपवर आरोप करणाऱ्या पायल घोषचा 'त्या' वक्तव्यावरून यूटर्न; आता मागणार माफी

दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या अभिनेत्री पायल घोषविरोधात (Payal Ghosh ) दुसऱ्या अभिनेत्रीने अब्रूनुकसानीचा दावा ठोकला.

  • Share this:

मुंबई, 07 ऑक्टोबर : दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) लैंगिक अत्याचाराचा आरोप करणारी अभिनेत्री पायल घोषने (Payal Ghosh )आता अभिनेत्री ऋचा चड्ढाबाबत (Richa Chadda) केलेल्या वक्तव्यावरून यूटर्न घेतला आहे. पायल घोष आपलं विधान मागे घेण्यासाठी आणि माफी मागण्यासाठी तयार असल्याचं तिचे वकील नितीन सातपुते यांनी कोर्टात सांगितलं.

अनुरागने 2014 मध्ये मला घरी बोलवून माझा विनयभंग केला आणि अश्लील वर्तन केलं, असं पायलने आपल्या आरोपामध्ये म्हटलं आहे. त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये पायलने या घटनेबाबत बोलताना ऋचा चड्ढाच्या नावाचाही उल्लेख केला होता. त्यानंतर ऋचाने पायलविरोधात हायकोर्टात धाव घेतली आणि पायलविरोघात एक कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला.

अभिनेत्री पायल घोषने सांगितलं, अनुराग कश्यपने तिला आपल्या घरी बोलावलं होतं, तेव्हा नशेत तिच्यासह जबरदस्ती केली. जेव्हा आपण याला विरोध केला तेव्हा अनुरागने माही गिल, ऋचा चड्ढा आणि हुमा कुरैशी यासारख्या अनेक अभिनेत्रींची नावं आपल्यासमोर घेतली. असं पायल एका मुलाखतीत म्हणाली. पायलने या प्रकरणात ऋचा चड्ढाचं नाव आणताच ऋचा चड्ढाने तिच्याविरोधात मानहानीचा दावा केला. मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली.

हे वाचा - "आता मला तिची खरी गरज आहे", जवळच्या व्यक्तीला गमावल्यानंतर काजोल झाली भावुक

"मी एक महिला आहे. आणि प्रत्येक महिलेला योग्य तो आदर मिळायला हवा. या मताची मी आहे. पण एखाद्या महिलेने दुसऱ्या महिलेवर बिनबुडाचे आरोप करताना विचार करायला हवा" असं  ऋचा चड्ढाने आपल्या कायदेशीर नोटिसीत म्हटलं.

ऋचाच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यावेळी पायल घोषचे वकील म्हणाले, "ऋचा चड्ढाबाबत केलेल्या विधानावरून पायल घोष माफी मागायला आणि आपलं वक्तव्य मागे घ्यायला तयार आहे"

हे वाचा - ड्रग्ज प्रकरणानंतर बाप-लेकीत दुरावा? साराविषयी सैफची अशी प्रतिक्रिया

22 सप्टेंबरला पायलने अनुरागविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. तिने गंभीर आरोप करत अनुरागविरोधात भादवी कलम 376, 354, 341, 342 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. यानंतर 1 ऑक्टोबरला अनुरागला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. अनुरागने आपला जबाब नोंदवला आहे. त्यावेळी अनुरागचे वकीलही उपस्थित होते.

Published by: Priya Lad
First published: October 7, 2020, 4:46 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या