'अनुरागनं माझ्यावर जबरदस्ती केली हे एका व्यक्तीला माहित होतं', पायल घोषनं घेतलं या क्रिकेटपटूचं नाव

'अनुरागनं माझ्यावर जबरदस्ती केली हे एका व्यक्तीला माहित होतं', पायल घोषनं घेतलं या क्रिकेटपटूचं नाव

पायलनं ट्वीट करत अनुराग कश्यापनं लैंगिक अत्याचार केल्याचं या क्रिकेटपटूला माहित होते, मात्र आता तो मौन धरत असल्याचे पायलनं म्हटले आहे.

  • Share this:

मुंबई, 18 ऑक्टोबर : अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. पायलने अनुराग कश्यप (Anurag Kashyap) विरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. अनुरागने 2014 मध्ये मला घरी बोलवून माझा विनयभंग केला आणि अश्लील वर्तन केलं, असं पायलने आपल्या आरोपामध्ये म्हटलं होतं. आता या प्रकरणी पायल घोषनं एका क्रिकेटपटूचं नाव घेतलं आहे. पायलनं ट्वीट करत अनुराग कश्यापनं लैंगिक अत्याचार केल्याचं या क्रिकेटपटूला माहित होते, मात्र आता तो मौन धरत असल्याचे पायलनं म्हटले आहे.

पायल घोषनं या प्रकरणी भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणचे नाव घेतले आहे. पायलनं ट्वीट करत, "अनुराग कश्यपनं माझ्यावर जबरदस्ती केल्याचे मी कधी बोलले नाही. मात्र इरफान पठाणला सर्व माहिती होते. माझा चांगला मित्र समजून मी त्याला सर्व सांगितलं होतं, मात्र आता त्यानं या प्रकरणी मौन धरले आहे". मात्र पायलनं इरफानला टॅग केल्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.

वाचा-कंगनाला 'टिवटिव' भोवणार! वांद्रे पोलिसांनी दाखल केला राजद्रोहाचा गुन्हा

वाचा-साध्यासुध्या 'अंजली भाभी'चा हॉट अंदाज; PHOTOS पाहून व्हाल क्लीन बोल्ड

त्यानंतर पायलनं इरफान पठाणसोबत फोटो शेअर केला. यात पायलनं म्हटले आहे की, "मी इरफानला टॅग केले याचा अर्थ मला तो आवडतो असे नाही. मी त्याला अनुराग कश्यपनं जबरदस्ती केल्याचे सांगितले होते. मी अपेक्षा करते की, मी इरफानला जे सांगितले आहे, त्याबद्दल त्यानं बोलावं". दरम्यान याआधी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये पायलने आपल्याविरोधात अयोग्य शब्द वापरले, असा दावा करत ऋचाने एक कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा केला होता.

वाचा-सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप भोवले, मुंबई पोलिसांनी केली वकिलाला अटक

पायल घोषने मागितली ऋचा चड्ढाची माफी

अभिनेत्री ऋचा चड्ढा (Richa Chadda)ने पायल घोष (Payal Ghosh )विरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता. मुंबई हायकोर्टामध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान दोघींच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे. ऋचाविरोधात केलेल्या वक्तव्याबाबत पायल घोषने रियाची माफी मागितली आहे. याआधी सोशल मीडियावर पायलने एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये ती असं म्हणाली होती की, "मी कुणाचीही माफी मागणार नाही. ऋचाबद्दल मी काहीही वाईट बोलले नाही त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. पण आज पायलने चक्क ऋचाची माफी मागून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. रिचाने केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी झाली. पायलने केलेल्या वक्तव्याबद्दल तिने ऋचाची माफी मागितली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: October 18, 2020, 9:14 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading