मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Pawankhind actors: 'पावनखिंड'च्या कलाकारांची पुन्हा जमली भट्टी; 'या' सिनेमात झळकणार एकत्र

Pawankhind actors: 'पावनखिंड'च्या कलाकारांची पुन्हा जमली भट्टी; 'या' सिनेमात झळकणार एकत्र

Pawankhind actors

Pawankhind actors

पावनखिंड चित्रपटाचे कलाकार पुन्हा एकदा एकत्र आलेत. पण यावेळी ते ऐतिहासिक चित्रपटात दिसणार नाहीत. तर प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन येत आहेत.

  मुंबई, 22 सप्टेंबर : चिन्मय मांडलेकरने अनेक नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज या चारही माध्यमात काम केले आहे. त्याचप्रमाणे तो उत्तम लेखक देखील आहे. मराठीनंतर आता हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील त्याने आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. नुकताच तो 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमात दिसला होता. त्याने या चित्रपटात खलनायिकाची बिट्टा कराटे ही  भूमिका उत्तम वठवली होती. त्याच्या या चित्रपटातील अभिनयाचे प्रचंड  कौतुक झालं होतं. बऱ्याच काळात चिन्मयने मराठी चित्रपटांमध्ये एकाच धाटणीची भूमिका केलीय. तो मुख्यतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसलाय. पण आता तो नवीन चित्रपटात एक नवी कोरी भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. चिन्मय मांडलेकर सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. त्याने या नवीन चित्रपटाबद्दल नुकतीच एक पोस्ट केली आहे. 'केस नंबर 99' हे चिन्मयच्या नवीन चित्रपटाचं नाव आहे. हा एक थरारक चित्रपट असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या चित्रपट त्याच्यासोबत मृण्मयी देशपांडे, अजय पुरकर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. हा चित्रपट निखिल लांजेकर यांनी  दिग्दर्शित केला आहे.
  हा चित्रपट नवीन जरी असला तरी त्याची सगळी टीम जुनीच आहे. म्हणजे या कालराणी याआधी  दिग्पाल लांजेकर यांच्या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका साकारल्या आहेत. आता हीच मंडळी प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन येत आहे. हेही वाचा - Nupur Shikhare: मिस्टर परफेक्शनिस्टचा जावई तर रणवीर सिंहचाही 'बाप'; विना कपडे केलं असं PHOTOSHOOT 'केस नंबर 99' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. त्याची माहिती चिन्मयने पोस्टमध्ये दिली आहे. शूट संपल्याचे काही फोटो शेअर करत त्याने लिहिलंय कि, 'या एका शब्दात शेवट ही आहे अन् सुरूवात ही. WRAP.' त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर  यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे एकूण 8 चित्रपट अर्थात ‘श्री शिवराज अष्टक’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच अष्टकामधील ‘फर्जंद’ हा पहिला चित्रपट ठरला होता. त्यानंतर ‘फत्तेशिकस्त’,  ‘पावनखिंड’आणि 'शेर शिवराज' हे चित्रपट सुपरहिट ठरले होते. यानंतर आता शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीवर आधारित  पाचवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या भूमिका अजून समोर आलेल्या नसल्या तरी सिनेमात शिवरायांची भूमिका चिन्मय मांडलेकरच  साकारणार आहे.
  Published by:Nishigandha Kshirsagar
  First published:

  Tags: Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या