मुंबई, 09 मार्च: सोशल मीडियावर चाहत्यांच्या अनेक फेव्हरिट जोड्या असतात. अगदी बॉलिवूड कलाकारच नव्हे तर टीव्ही सेलिब्रिटी, गायक, खेळाडू इ. सेलेब्सच्या रिलेशनशिपबाबत नेहमीच चर्चा होत असते. असेच दोन गायक-गायिका नेहमी चर्चेत असतात, ते म्हणजे पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal and Pawandeep Rajan Relationship rumors). या दोघांनी एकत्र इंडियन आयडल 12 (Indian Idol 12) मध्ये सहभाग घेतला होता. हा सीझन संपून बरेच दिवस झाले मात्र त्यांच्या नात्याची चर्चा अजूनही आहे. हा शो सुरू असतनाच त्यांच्यातील केमिस्ट्रीची चर्चा होत होती. त्यानंतर दोघांनी एकत्र काही गाणी देखील गायली. सोशल मीडियावर तर त्यांच्या लग्नाच्या चर्चाही झाल्या. दरम्यान दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत कोणतंच स्पष्टीकरण दिलं नाही आहे, किंवा त्यांच्या नात्याबाबत शिक्कामोर्तब देखील केलं नाही आहे.
सध्या ही गायक जोडी यूएसमध्ये आहे. याठिकाणी त्यांचे लाइव्ह शो सुरू आहेत. मात्र असं असूनही हे कलाकार एकमेकांसह वेळ घालवत आहेत. दोघांचे काही लेटेस्ट फोटोही समोर आल्याने पुन्हा एकदा त्यांच्या डेटिंग रुमर्सना उधाण आलं आहे. या दोघांनी सोशल मीडियावर काही स्वत:चे फोटो शेअर केले होते. मात्र त्याच आउटफिटमधील दोघांचे एकत्र फोटो त्यांनी पोस्ट केले नव्हते. मात्र ड्रमर तुषार कामरा याने या दोघांसह काही फोटो पोस्ट केले आहेत आणि ते काही वेळातच व्हायरल झाले आहेत. त्यामुळे चाहत्यांनी त्यांची ही फेव्हरिट जोडी एकत्र वेळ घालवत असल्याचे लक्षात आले. त्यांचे एकत्र फोटो समोर आल्यानंतर ट्विटरवर काही वेळासाठी #Arudeep असा हॅशटगही ट्रेंड होत होता. इन्स्टाग्रामवरही असाच हॅशटॅग वापरुन या जोडीचे चाहते कमेंट्स करत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान काही दिवसांपूर्वी अशी माहिती समोर आली होती ती अरुणीता कांजीलालच्या वडिलांना तीचं आणि पवनदीपचं एकत्र असणं आवडत नाही आहे. त्यामुळे अरुणीताने एक म्युझिक व्हिडीओ देखील सोडला होता.
View this post on Instagram
दरम्यान या दोघांसह यूएसमध्ये इंडियन आयडलमधील सायली कांबळे आणि मोहम्मद दानिश देखील आहेत. या चौघांचा एकत्र फोटो देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला होता. हे कलाकार इन्स्टाग्रामवर त्यांचे फोटोज आणि रील्स शेअर करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.