मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Breakup नंतर पहिल्यांदाच व्यक्त झाली 'पवित्र रिश्ता' फेम आशा नेगी, म्हणाली...

Breakup नंतर पहिल्यांदाच व्यक्त झाली 'पवित्र रिश्ता' फेम आशा नेगी, म्हणाली...

आशा आणि रित्विक तब्बल 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.

आशा आणि रित्विक तब्बल 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.

आशा आणि रित्विक तब्बल 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 9 जून-  छोट्या पडद्यावरील (Tv Actress) अभिनेत्री आशा नेगी (Asha Negi)  आणि अभिनेता रित्विक धनजानी (Rithvik Dhanjani) एक क्यूट कपल म्हणून ओळखलं जात होतं. तब्बल 6 वर्षे हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र तरीसुद्धा याचं नात लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. गेल्यावर्षी यांच्या ब्रेकअपच्या (Breakup) बातम्यांनी चाहत्यांना खुपचं दुख झालं होतं. आत्ता ब्रेकअपच्या 1 वर्षानंतर आशा नेगीने पहिल्यांदा यावर संवाद साधला आहे.

View this post on Instagram

A post shared by MsNegi (@ashanegi)

पिंकविला सोबत झालेल्या मुलाखती दरम्यान आशाने याबद्दल खुलासा केला आहे. हे दोघेही आत्ता आप-आपल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत. दोघांनीही एकेमेकांच्या सहमतीने विभक्त होण्याचं निर्णय घेतला होता. पिंकविलाशी बोलताना आशाने म्हटलं आहे, ‘आम्ही दोघेही आत्ता एकदम नॉर्मल आहोत. आमच्यामध्ये एक चांगलं नात आहे. आम्हाला जेव्हा एकमेकांशी बोलावं वाटतं, तेव्हा आम्ही बोलतो. तसेच आम्ही सगळ्या गोष्टी एकमेकांशी शेयरसुद्धा करतो.आत्ता सगळ काही नॉर्मल झालं आहे. मी माझ्या आयुष्यात पुढे गेलीय.  आणि तोसुद्धा आत्ता आपल्या आयुष्यात पुढे गेला आहे. आम्हाला विभक्त होऊन 1 वर्ष झाला आहे. त्यामुळे सर्वांनाचं पुढ जावं लागणार. आम्ही नेहमीच एकमेकांबद्दल चांगला विचार करतो. मला त्याला यशाच्या शिखरावर पोहोचलेलं बघायचं आहे. असंही आशाने म्हटलं आहे.

(हे वाचा:मुक्ताची पुन्हा छोट्या पडद्यावर एंट्री, उमेशसोबत करणार रोमान्स )

आशा सध्या ‘ख्वाबो के परिंदे’ या शोमध्ये काम करत आहे. याबद्दल ती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्टसुद्धा करत असते. नुकताच तिने पोस्ट करून सांगितलं आहे, की हा शो येत्या 14 जून पासून सुरु होणार आहे.

(हे वाचा: HBD Sonam: फॅशनिस्टा सोनमनं एकेकाळी केली होती वेटरची नोकरी  )

आशा नेगी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचली आहे. तसेच अभिनेता रित्विक धनजानीसुद्धा याच मालिकेत तिच्यासोबत होता. या मालिकेनंतर आशा खुपचं दिवस छोट्या पडद्यापासून दूर होती. त्यांनतर ती एकता कपूरच्या बारीश आणि बारीश 2 या वेबसिरीजमध्ये दिसून आली होती. सध्या ती ‘ख्वाबो के परिंदे’ च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

First published:

Tags: Entertainment, Tv actress