Home /News /entertainment /

'ते एकटेच लढत आहेत मला तिकडे घेऊन चला' बाजीप्रभूंवर प्रेम करणाऱ्या चिमुकल्याचा अभिमानस्पद किस्सा

'ते एकटेच लढत आहेत मला तिकडे घेऊन चला' बाजीप्रभूंवर प्रेम करणाऱ्या चिमुकल्याचा अभिमानस्पद किस्सा


'ते एकटेच लढत आहेत मला तिकडे घेऊन चला' बाजीप्रभूंवर प्रेम करणाऱ्या चिमुकल्याचा अभिमानस्पद किस्सा

'ते एकटेच लढत आहेत मला तिकडे घेऊन चला' बाजीप्रभूंवर प्रेम करणाऱ्या चिमुकल्याचा अभिमानस्पद किस्सा

पावनखिंड (Pavankhind) हा सिनेमा लहानांपासून मोठ्यांपर्यंत पोहोचला. लहान मुलांमध्ये महाराजांच्या पराक्रमाची गोडी निर्माण झाली. बाजीप्रभूंवर प्रेम करणाऱ्या अशाच एका चिमुकल्याचा किस्सा अभिनेते अजय पूरकर (Ajay Purkar) यांनी सांगितला आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 16 जून: शिवाजी महाराजांचा ( Shivaji Maharaj) पराक्रम आणि बाजीप्रभूंच्या ( Bajiprabhu Deshpande) परक्रमाची गाथा सांगाणाऱ्या पावनखिंड ( Pawankhind)  या सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकली.  फक्त मोठ्यांचच नाही तर छोट्या दोस्तांनीही सिनेमाला भरभरुन प्रेम दिलं. येणाऱ्या नव्या पिढीपर्यंत सिनेमा पोहोचवण्यात सिनेमाची टीम यशस्वी झाली. लहान मुलांपर्यंत सिनेमा पोहोचला. बाजीप्रभूंवर प्रेम करणाऱ्या चिमुकल्याचा अभिमानस्पद किस्सा अभिनेते अजय पूरकर ( Actor Ajay Purkar) यांनी सांगितला आहे.  जो ऐकून सर्वांची छाती अभिमानान फुलून येईल. हिंदी तसेच साऊथ सिनेमांनाही पावनखिंडनं चांगलीच टक्कर देत बॉक्स ऑफिसवर भरगोस कमाई केली. मोठ्या पडद्यावर मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर सिनेमा आता छोट्या पडद्यावर दिसण्यासाठी सज्ज झाला आहे.  प्रवाह पिक्चरला 19 जूनला सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पाहायला मिळणार आहे. हेही वाचा - बाजीप्रभूंचं बलिदान अन् महाराजांच्या प्रेमापोटी अभिनेत्यानं उचललं मोठं पाऊल, विशाळगडाच्या पायथ्याशी केलं असं काही सिनेमाच्या वर्ल्ड प्रिमियरच्या निमित्तानं अजय पूरकरांनी एक किस्सा शेअर केला ते म्हणाले,   'या सिनेमामुळे फक्त मोठ्यांचच नाही तर छोट्या दोस्तांचंही भरभरुन प्रेम मिळालं आहे. हे सगळे छोटे दोस्त मला आवडीने भेटवस्तू घेऊन येतात. एक किस्सा तर एका पालकांनी मला सांगितला तो असा की, त्यांचा मुलगा मध्यरात्री झोपेतून रडत उठला आणि म्हणाला, 'बाजीप्रभू एकटेच उभे राहून लढत आहेत मला तिकडे घेऊन चला'. हे निरागस प्रेम पाहून भारावून जायला होतं. या पीढीपर्यंत जेव्हा आपल्या शूरवीरांचं बलिदान पोहोचतं तेव्हा खरं सिनेमा यशस्वी झाला असं ठामपणे म्हणता येईल'. मराठी सिनेमाची नवी कोरी वाहिनी म्हणून प्रवाह पिक्चर ( Pravah Picture) वाहिनीची सुरुवात झाली आहे.  पावनखिंड सिनेमापासून या धमादेकार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरची सुरुवात होणार आहे.   सिनेमात महापराक्रमी बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका अभिनेते अजय पुरकर यांनी  साकारली. अजय पूरकर यांनी फक्त बाजीप्रभू साकारले नाहीत तर ते भूमिका प्रत्यक्ष जगले. छत्रपती शिवाज महाराज आणि बाजीप्रभूंच्या प्रेमापोटी अभिनेते अजय पुरकर यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी घर बांधलं आहे.  त्यांच्या या घराचीही सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या