मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'Indian Idol 12'फेम पवनदीप-अरूणिता करणार साखरपुडा! 'Manzoor Dil'ने केलं चाहत्यांना सरप्राईज

'Indian Idol 12'फेम पवनदीप-अरूणिता करणार साखरपुडा! 'Manzoor Dil'ने केलं चाहत्यांना सरप्राईज

इंडियन आयडॉल 12शो दरम्यान, पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांच्या जोडीबद्दल चर्चा होती की दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे.

इंडियन आयडॉल 12शो दरम्यान, पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांच्या जोडीबद्दल चर्चा होती की दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे.

इंडियन आयडॉल 12शो दरम्यान, पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांच्या जोडीबद्दल चर्चा होती की दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे.

मुंबई,20ऑक्टोबर- टीव्ही रिअॅलिटी शो इंडियन आयडॉल 12(Indian Idol 12) चा विजेता, पवनदीप राजन(Pavandip Rajan) आणि शोची पहिली उपविजेती अरुणिता कांजीलाल(Arunita Kanjilal) यांना शो संपल्यानंतरही सतत चाहत्यांचं प्रेम मिळत आहे. रिअॅलिटी शोनंतर दोघेही अनेक प्रसंगी एकत्र दिसले आहेत. पवन-अरुणिता यांनी अनेक गाण्यांना आपला आवाजदेखील दिला आहे. आता पुन्हा एकदा ही जोडी धम्माल करण्यासाठी सज्ज झाली आहे. यावेळी त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी एक खास सरप्राईज आणलं आहे.

" isDesktop="true" id="620566" >

इंडियन आयडॉल 12शो दरम्यान, पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांच्या जोडीबद्दल चर्चा होती की दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे. मात्र, दोघांनीही ही बातमी पूर्ण अफवा असल्याचं म्हटलं होतं. दोघांनीही अनेक मुलाखतींमध्ये हे स्पष्ट केलं आहे की ते दोघेही फक्त चांगले मित्र आहेत. त्यांच्यामध्ये असं काहीही नाहीय. पण त्यांच्या चाहत्यांना मात्र दोघांची जोडी कायमची असावी अशी इच्छा आहे.आता दोघेही चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण करणार आहेत, प्रत्यक्षात नाही तर रील लाइफमध्ये. पवनदीप आणि अरुणिता लवकरच साखरपुडा करताना दिसतील. दोघेही आपलं एक नवीन गाणं रिलीज करणार आहेत, ज्यात दोघेही पहिल्यांदाच त्यांच्या आवाजासह अभिनय करताना दिसतील. गाण्याचे बोल आहेत- मंजूर दिल 'मंजूर दिल', ज्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.

काय आहे टिझर-

या टीझरबद्दल बोलायचे झाले तर, टीझरमध्ये पवन अरुणिताला आपल्या मनातील गोष्ट सांगताना दिसत आहे. टीझरमध्ये पवन अरुणिताला म्हणतो, 'मी एक गोष्ट विचारु ...' यावर अरुणिता म्हणते, 'हो विचारा ...' पवन म्हणतो - 'साथ दोगी न मेरा' ... यावर अरुणिता म्हणते 'हमेशा'... दोघांचा हा रोमँटिक सॉन्ग 23 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. अलीकडेच, त्यांनी या गाण्याबाबत न्यूज 18 हिंदीशी खास संवाद साधला होता, ज्यात त्यांनी पडद्यासमोर येऊन गाण्यासह अभिनयाबद्दल आपले मत दिल होतं.

(हे वाचा:इंडियन आयडॉल फेम पवनदीप-अरुणिताने गुपचूप उरकलं लग्न? Wedding ... )

शो दरम्यान, गाण्याचे दिग्दर्शक आणि निर्माते राज सुराणी यांनी या गाण्याबद्दल सांगितलं. त्यांनी सांगितल की या गाण्याचे शूटिंग अनेक ठिकाणी करण्यात आलं आहे. दोघांनी सोबत गाणी अनेक वेळा गायिली आहेत, पण या दोघांनी पहिल्यांदाच अभिनय केला आहे. त्यांनी सांगितलं की त्यानी पवन-अरुणितासोबत 20 गाणी साइन केली आहेत, जी लवकरच एकापाठोपाठ रिलीज केली जातील.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Indian idol